सलाह (नमाज) इस्लामचा दुसरा स्तंभ


इस्लामचा ५ खांबांपैकी सलाह अर्थात नमाज हा दुसरा खंभ आहे  . नमाज हे एक अनिवार्य कार्य आहे,आणि ते पाच वेळा सादर करणे आवश्यक आहे. ह्याचे मुख्य हेतू अल्लाह चे  चिंतन व  अल्लाहवर लक्ष केंद्रित करणे हे  हेतू आहे. नमाज हि अल्लाहबरोबर एक वैयक्तिक संवाद आहे आणि त्यातून कृतज्ञता आणि उपासना व्यक्त केली पाहिजे .हे एक अनिवार्य कार्य आहे आणि इस्लामचा एक मुख्य पाया आहे . इमान दर्शवणारी एक मुख्य  कृती आणि अल्लाहच्या वाटेकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग .  नमाज  अरबी भाषेत  अर्पण करतात आणि त्यात म्हंटले जाणारे श्लोक हे कुरआन चे छोटे अथवा मोठे श्लोक असतात . नमाज , पश्चात्ताप करणार्यासाठी एक  निवारा,भयभीतांसाठी एक सुरक्षित ठिकाण,  कष्ट कार्यांसाठी एक उत्तम विश्रांतीची जागा  आणि ह्रदयासाठी एक सुखरूप आणि शांततेचा निवारा.

 

सामग्री

 

भाषार्थ

औपचारिक  प्रार्थनेसाठी दिलेली नाव म्हणजे '  सलाह '  अर्थात नमाज . हे धर्माचे एक आवश्यक अधिकार आहे आणि एका मुसल्माना साठी  दिवसातून ५ वेळा हे  अर्पण करणे हुकुमावरून  गरजेचे आहे . .अरबी भाषेत अस-सलाह अर्थात दूआ ( पुकार )

 

इस्लामिक अर्थ

इस्लामनुसार एका  विशिष्ट पद्दतीने आणि विशिष्ट श्लोक उच्चारून ज्या कृती केल्या जातात

 

त्याला सलाह असे म्हणतात . ह्याची सुरुवात  '  तकबीर ' अर्थात " अल्लाहुअकबर "

 

(अल्लाह सर्वात महान आहे)  याच्या उच्चाराने होते  आणि,  अंत ' तस्लीम ' अर्थात " अस सलामू अलैकुम व रहमतुल्लाही व बरकातुहू " (अल्लाहची दया , आशीर्वाद आणि कृपा तुम्हावर असू दे)  असे उच्चारून होते .

 

सलाह्चे ८ अर्थ

१) दुसरी स्थितीत आणि  अर्थ अरब कवी द्वारे वापरले गेलेले

२) दरुद ए इब्राहीम ( स बुखारी ६ / ३२०- ३२२ )

३) आह्वान ( क़ुरान  ९ / १०३ )

४) कोणत्याही गोष्टीला आग मध्ये प्रवेश करण्यासाठी ( Qउरान १११ / ३)

५) अल्लाहचे विशेष आशीर्वाद ( क़ुरान ३३ /५६ )

६) मठ (क़ुरान २२/ ४० )

७) अत्यंत पुरस्काराने सन्मानित प्रशंसा आणि अल्लाहकडून खास आशीर्वाद बहाल करण्याची याचना ( क़ुरान ३३/५६ )

८) शरीराच्या खालच्या भागाची  क्रिया किव्हा गती

९) प्रेषित मुहम्मद स व स यांचाकडून शिकविलेल्या पद्दतीने

 

मुन्किरीन  हदीस साठी खबरदारी

जर कोणी क़ुरान सु बक़रह २ / ४३ ( नमाज कायम करा )  हे वाजून , वरती नमूद केलेल्या ९ अर्थांपैकी दुसरे कोणते अर्थ, अथवा शब्दकोशातील अर्थ  किव्हा  अल हदीस व्यतिरिक्त अर्थ   घेतले,  जसे

"  क़ुरान  सु लहब १११/३ -سَيَصْلَىٰ نَارًا ذَاتَ لَهَبٍभयानक आग मध्ये प्रवेश करणे " किव्हा असा अर्थ कि शरीराच्या खालच्या भागात हालचाल , तर ते अत्यंत चुकीचे आणि विपत गामी  ठरेल.मुहम्मद स व स म्हणाले ," सल्लू कमा रअय्तुमूनी उसल्ली" अर्थ , नमाज अशी अदा करा जसे तुम्ही मला करताना पाहिले " सही बुखारी १/ ६०४ .

 

त्यामुळे क़ुरान हे मुहम्मद स व स यांच्या दृष्टीकोनातून आणि जसे त्यांनी हदीसमध्ये आपणास समजावले आहे ,तसेच घेतले पाहिजे . जर कोणी शब्ध्कोशी अर्थ स्वत वापरून ह्याचे अर्थ लावण्याचे पर्यंत्नकरील तो सरळ मार्गावरून निश्चित भटकणार.

 

कुरआन

कथन करा ,(ओ मुहम्मद ) जे तुम्हास पुस्तकात  प्रकट केले आहे आणि नमाज /प्रार्थना स्थापन करा .   निश्चित प्रार्थना /नमाज अनैतिकता आणि चुकीच्या मार्गापासून दूर करते . आणि अल्लाहचे स्मरण करण्यास मदत करते .  तुम्ही जे काही करता त्याचे अल्लाहला पूर्ण ज्ञान आहे (कुरआन सु अंकबूत २९/४५ )

 

जे विश्वास करतात,त्यांच्यासाठी प्रार्थना हि गुनाह/पाप  करण्यापासून रोकते आणि  देवाची आठवण अर्थात देवाचे स्मरण सतत ध्यानी ठेवण्यास मदत करते . विशेषत:, जर प्रार्थना अगदी मनापासून आणि चुका टाळण्याचा प्रयत्न करून अर्पण केली तर निश्चित आपल्याकडून होणारयाचुका , गुनाह, अन्याय ह्या सर्व पासून टाळते . ह्याचे कारणअसे कि आपल्या मनात सतत एका प्रार्थनेच्या वेळे पासून दुसर्या वेळेपर्यंत सतत देवाचे आणि त्याच्या दरी धाव घ्यायची ओढ असेल.

 

क़ुरान सु ताहा २०: १३०  मध्ये पाच वेळा नमाझचे संकेत देते ,"  ते जे बोलतात त्यावर  धीर धरा आणि सूर्योदयाच्या आधी , सुर्यास्था नंतर आणि  मध्यरात्रीच्या वेळी आणि दिवस अखेर  परमेश्वराचे उपकार माना , जेणेकरून तुमच्या मनाला शांती आणि तृप्ती  मिळेल.

 

हदीस

दररोज पाच प्रार्थना आणि शुक्रवार ची  प्रार्थना ,   एक शुक्रवार च्या  प्रर्थानेपासून  दुसर्या  शुक्रवार पर्यंतचा  दरम्यान एक प्रायश्चिताचे कारण बनते.(  सही मुस्लिम ४४८ )

 

पै  मुहम्मद स व स यांनी म्हटले आहे," निश्चित प्रार्थना दुर्लक्षा हे कारण आहे  एका माणसाच्या अविश्वासा मध्ये  आणि अनेकदेवता मानण्या मध्ये  "(सही मुस्लिम ८२, इब्न माजह २:२ :१०७८)

 

प्रार्थनेचे महत्त्व

नमाज ( सलाह ) इस्लामचा महान पाया, मांची  उच्चतम कृती आणि अल्लाहच्या  जवळ जाण्याचा, राहाण्याच सर्वात जवळचा मार्ग . नमाज  हि फरक करून देते एक मुस्लिम आणि एक गैर मुस्लिम पासून . नमाज हि पश्चात्ताप करणार्यांसाठी एक उत्तम निवारा ,भयभीतांसाठी   सुरक्षित ठिकाणी, कष्ट कार्यांसाठी उत्तम कौशल्य आणि शांततेसाठी  उत्तम मालमत्ता.

 

त्याची ज्योत आणि प्रकाश मनात  जमलेले जंग दूर करते , रुदायाच्या गाभार्यापर्यंत  खोलवर ते प्रवेश करते ,आणि त्याचे निर्देशस्तंभ ध्येय आणि अकांक्षाच्या शिखारा पर्यंत पोचवते.

 

सलाह पूजा /उपासना चे उच्चतम कार्य

सलाह ( नमाज ) हि अनेक ऊपासना आणि  पूजा मधून अल्लाहच्या जवळ  आणि  त्याच्या कडे प्रार्थनेची सर्वात उच्च  कृती आहे. अल्लाहने नमाज हे अगदी संपूर्ण आणि परिपूर्ण रित्या आपल्याला दर्शविले आहे . ह्याचे घटक अल्लाहची तारीफ , त्याची स्तुती, आपल्या पूर्ण शरीराच्या अव्ययाद्वारे  जसे, हात, पाय , जीभ जी सतत देवाची स्मरण करे , डोकं आणि प्रतॆक अव्यय आणि ज्ञान इंद्रिये जी देवाच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करते .

 

शरीराचे प्रतॆक अव्यय जी उपासना ती करते त्याचे फळ उपभोगते , फक्त बाह्य रुपी अव्यय न्हवे तर अंतरीय अव्यय देखील .आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, रुदायाचा भाग सर्वात मोठा आहे या  सर्वात.

 

सलाह्चे भाग अथवा घटक:  स्तुती , उदात्तीकरण, नामस्मरण ( तस्बीह) ,  तकबीर ( अल्लाह सर्वात श्रेष्ठ असल्याची कबुली ) तसेच हे  सत्य जाहीर करणे .   सलाह म्हणजे  आपल्या प्रभू समोर,जो निर्माता आहे,  अत्यंत नम्रतेने ,  पारतंत्रतेणे  हजीरी देणे .  ह्या गोष्टीची जाणीव असणे कि तोच आहे जो आपली काळजी, लक्ष आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट पुरवणारा . अत्यंत विनयशील पणे प्रभू समोर त्यांनीच शिकवलेल्या शब्दानद्वारे  याचना करणे म्हणजेच  सलाह आहे .

 

आपल्या निर्मात्या समोर विनयशील पणे झुकणे ,  अर्पित करणे आणि आपल्याला त्याची गरज असल्याचे स्वीकार करणे . माणसाचे सर्वात मोठे आत्मसम्मान आणि गौरव त्याच्या चेहऱ्यात असते . आपण जेव्हा सलाह मध्ये  (नमाज )  अल्लाहपुढे नतमस्तक होतो   तेव्हा आपण आपला पूर्ण सम्मान आणि गौरव त्याच्यापुढे ठेवतो .  तूहीसर्वात महान , तूहीसर्वात प्रबल ह्याचा आपण स्वीकार करतो .  रुदायाब्रोबर शरीर हि हे सत्य स्वीकारत असतं . आणि सर्व ज्ञान इंद्रिय हे स्वीकारतात . ( मिफ्ताहुदारिस्सआदह२/२३०,२३१) इब्नुल क़य्यिम.

 

अल्लाह कडून एक अनमोल भेट

प्रार्थना हि अल्लाहकडून त्याच्या वर विश्वास करणार्यांसाठी एक अनमोल भेट आहे . त्याच्या वर विश्वास करणाऱ्या आपण गुलामांवर त्याची कृपा आहे . त्याने आपल्याला मार्गदर्शन केले , परिचित करून दिले . त्याच्या प्रामाणिक आणि विशेषाधिकार दुताकडून मुहम्मद स व स आपणास परीषित कडून दिले ताके आपण त्याची कृपा आणि आभार व्यक्त करू .

 

प्रार्थना मागे त्याचा  उद्देश असा कि ह्या द्वारे तो आपले स्तान, मान उच्च करेन  आणि त्याचाशी ज्यास्त  जवळीक निर्माण करेन . आपल्या जवळ भक्तांनी निकटचे स्तन प्राप्त करावे हि त्याची इच्छा . आणि हे सर्व त्यांनी  त्याला गरज आहे म्हणून न्हावे तर आपल्यावर त्याचे उपकार म्हणून केले . देवाला आपली गरजनाही , तर आपल्याला त्याची गरज आहे.

 

प्रार्थना माध्यमातून, अल्लाह ने त्याच्यावर   विश्वास करणार्याचे मार्गदर्शन केले कि ते आपल्या शरीरा द्वारे आणि रुदायापासून त्याची पूजा करतील . मना पासून जोकोणी त्याची भक्ती करेल  जास्तीत जास्त लाभ होईल. जास्तीत जास्त अल्लाहच्या जवळ जाण्यासाठी त्याची तळमळ असेल आणि संपूर्ण रित्या  तो अल्लाहच्या जवळ आपले स्तान निर्माण करेल . ह्या अवस्थेत त्याला खूप सुख  शांती आणि तृप्तता भासेल आणि त्याला स्वताल आत्याची हि अवस्था खूप आवडेल . हे वास्तव आहे आणि हीजी अवस्था जेव्हा देवासमोर आपण सलाह मध्ये उभे राहतो आणि जेव्हा आपण स्वतःला ह्या अस्वस्तेसाठी तयार करतो  हि अत्त्यन्त सुंदर आहे . हे सतत आपल्याला आठवण करत  राहता त्या मोठ्या भव्य दिवसाची जेव्हा पूर्ण मनुष्य जात त्याच्या समोर उभी राहील .

 

पाच आवश्यक प्रार्थना वेळ

प्रत्येक मुस्लिम (पुरुष व महिला दोन्ही) वर  दररोज पाच वेळ प्रार्थना आवश्यक ( फर्ज )  आहेत. आपण हि इस्लामिक प्रार्थना सोडू शकत नाही,मुस्लिम म्हणून आपली  ओळख आहे

 1. पहिल्या प्रकाश आणि सूर्योदय दरम्यान.
   
 2. सूर्य आकाशाच्या मध्यभागी पार केल्या नंतर
   
 3. मध्य दुपारी आणि सुर्यास्त दरम्यान.
   
 4. सूर्यास्त आणि दिवस शेवटचा प्रकाशा दरम्यान.
   
 5. अंधार आणि मध्यरात्री दरम्यान

 

टीप: सामान्य मार्गदर्शक तत्त्वे

 1. क़िबला ( नमाज ज्या दिशेकडे अर्पण केली जाते ) -  दिशा आणि प्रार्थना वेळ जाणून घेणे (संपर्क जवळचीसुन्नी मस्जिद)
   
 2. प्रार्थनेत केली जाणारी शरीर हालचाली आणि त्यात म्हंटले जाणारे वाक्य अथवा श्लोक ह्यांना जाणून घेणे व त्याचे अर्थ समजून घेणे .
   
 3. सुरहफातिहा - जो सर्वात पहिला सूरहआहे व प्रत्येक नमाज त्याविना पूर्ण होऊ शकत नाही हे जाणून समजून  योग्य रित्या उच्चारणे .

 

सलाह्चे गुणवत्तेशी

 1. अल फह्षा प्रतिबंधित करते (सर्व प्रकारचे महान पाप, बेकायदेशीर समागम इ.) आणि अल मुन्कर (अविश्वास, अल्लाहशिवाय दुसरा कोणी पूजनीय असल्याची समज ,प्रत्येक वाईट दुष्ट कृत्य ( क़ुरान २९/४५ )
   
 2. ला इलाहाइल्लल्लाहहे जे इमानच्याअसक्शीचे श्लोक आहे त्यानंतरचेसर्वातउत्तम कार्य ( बुखारी  & मुस्लीम हदीस)
   
 3. पापाचे नाश करता ( हदीसमुस्लिम १/१४१० :  जाबिर र अ )
   
 4. पापांपासून मुक्तता ( हदीथ मुस्लिम १ /४५०  : अबू हुरेरा र अ )
   
 5. प्रकाश आणि नंतरच्या जीवनासाठी ( हदीसमुस्नद अहमद  २/१६९ :उमर र अ )
   
 6. पाप धुवून एकाध्याचे मान उंचावतो (हदीसमुस्लिम १/९८९ )
   
 7. एक मोठे कारण पै मुहम्मदस व स यांच्या सोबतीने स्वर्गात प्रवेश मिळण्या साठी    ( हदीसमुस्लिम १/९९० रबीआह अल असलमी र अ )
   
 8. एक सलाह पासून दुसर्याच्या दर्मियांचे पाप धुतले जातात ( हदीसमुस्लिम १/४३८ उसमानर अ )
   
 9. जो आपल्या प्रार्थनेच्या जागी बसून राहील देवदूत त्याच्या करिता कृपा याचना करतील ( हदीसबुखारी ३/३३० अबू हुरेरा र अ , हदीसमुस्लिम )
   
 10. एका सलाह्च्या वेळेपासून दुसर्या वेळेसाठी वाट पहात राहणाऱ्या लोकांसाठी (ज्याला रुबात म्हणतात ) हदीसमुस्लिम २५१ अबू हुरेरार अ )
   
 11. जो प्रार्थनेसाठी मस्जिद ला जातो तो परत येई पर्यंत प्रार्थनेत असल्यासारखे आहे ( हदीससही अबू हुरेरः )

 

पहा

पै मुहम्मद स व स

इस्लामचा खांब

सलाह मुद्दे

हज्ज

 

संदर्भ

the Book of Salah (Prayers)Step by Step by SalehAs-Saleh

http://understand-islam.net/salat/05.html

996 Views
आम्हाला ठीक करा, किंवा स्वत:ला ठीक करा.
.
Comments
सुरुवातीचा पान