वुज़ू  (अभ्यंगस्नान)

 इस्लाम मध्ये अभ्यंगस्नानकिंवा वुज़ू म्हणजे,  चेहरा, हात,  डोके, पाय पाण्याने धुणे असे आहे. वुज़ू ही एक इस्लामिक प्रक्रिया आहे जेणेकरून प्रार्थना सुरु करण्यापूर्वी  शरीराच्या विशिष्ट भागांना पाण्याने धूउन घेतले जाते.वुज़ूचा  शब्दशः अर्थ स्वच्छता आणि शरिअत  (इस्लामी कायदा) अनुसार, तीन निर्दिष्ट भाग धुणे आणि पाण्याच्या हाताने डोक्यावरून हात फिरवणे. याशिवाय नमाज़( प्रार्थना ) होऊ शकत नाही . .

कुरआन मध्ये अल्लाहने नमूद केले आहे , "ओ तुम्ही जे  विश्वास करता !  जेव्हा तुम्ही प्रार्थनेसाठी तयार व्हाल तेंव्हा आपला  चेहरा, आपले हात (हाताच्या  कोणा  पर्यंत) धुवावे. डोक्यावरून पाण्याचा हाथ फिरवावा आणि पाय घोट्या पर्यंत धुवावे . ( सुरह मैदाह ५/६ ) [1]

 

सामग्री सारणी

 

वुज़ूचे महत्त्व

अबू हुरेरः र अ म्हणले कि , मुहम्मदम्हणाले , “जेव्हा एक मुस्लिम किंव्हा विश्वास ठेवणारा गुलाम वुज़ू करतो आणि जेव्हा तो त्याचाचेहरा धुतो तेंव्हा त्याच्या डोळ्यांनी पाहिलेली प्रत्येक चूक त्या पाण्याबरोबर वाहून जाते. किंव्हा शेवटच्या पाण्याच्या थेंबाबरोबर तो जेव्हा हातधुतो तेव्हा त्याच्या हातांनी केलेला गुन्हा त्या पाण्याने वाहून जातो (किंव्हा शेवटच्या पाण्याच्या थेंबा बरोबर ) तसेच जेव्हा तो पाय धुतो तेव्हा त्या पायांनी ज्या गून्हाकडे तो गेला ते सर्व शेवटच्या पाण्याच्या थेंबा बरोबर वाहून जातात. जो पर्यंत तो शुद्ध होवून निघत नाही ( सही मुस्लिम १४८&४७५ , मुव्तः मलिक ३२)

उमर इब्न अल खत्ताबर अ म्हणले कि मुहम्मदयांनी सांगितले कि,”तुमच्यापैकी कोणीही जर बरोबर आणि योग्य तऱ्हेने वुज़ू करेल आणि ह्या गोष्टीची साक्षदेईल कि,अल्लाह शिवाय कोणीही दुसरे देव नाही आणि मुहम्मदत्याचे नबी आहेत तर नंदनवनाचे आठ हि दार त्यासाठी उघडले जातील आणि त्याच्या मर्जीनुसार तो ज्या दारातून इच्छितो प्रवेश करू शकेल ( तिर्मिजी १/५५)

'उस्मान इब्न आफ्फान र अ अहवाल केले कि , मुहम्मदम्हणाले , " जो कोणी योग्य तऱ्हेने वुज़ू करेल त्याचे सर्व चुका अगदी त्याच्या नखा खालून देखील त्याचे शरीर सोडून जातील . (सही मुस्लिम ४७६ )[2]

 

हदीस

 प्रार्थना सुरु करण्यापूर्वी वुज़ू आवशक आहे, त्याविना प्रार्थना स्वीकारली जात नाही  (मुस्लिम # 224)

उस्मानबिन आफ्फानचागुलाम हुमरान म्हणाला कि, " मी उस्मानला वुज़ू करताना पहिले. त्यांनी आपल्या हातावर तीन वेळा पाणी घातले, मग तीन वेळा चूळ भरली आणि  नाक स्वच्छधुतले, तीन वेळा चेहरा धुतला,  मग त्याने आपला उजवा हात कोण्यापर्यंत धुतले, मगडोक्यावरूनओलIहात फिरवला, उजवा पाय तीन वेळा धुतला. मग डावा पाय तीन वेळा " ते पुढे म्हणाले , मी मुहम्मद यांना असे वुज़ू करताना पहिले. तेम्हणाले, " जो कोणी असे माझ्यासारखे वुज़ू करेल आणि नंतर दोन रकात नमाज पढेल,इतर काहीही विचार  न करता तर अल्लाह त्याच्या सर्व मागील पापांची क्षमा करणार . ( बुखारी १८३२) [3]

 

वुज़ूचे प्रकार

1.       फर्द /फर्ज  (आवश्यक असणारा)-

नमाज़साठी वुज़ू असणेआवश्यकआहे. तसेच कुरआन स्पर्श करण्यासाठी वुज़ू असणे आवश्यक आहे, पण काही विद्वानांच्या मते ते फर्ज आहे आणि काहीच्या मते ते मुस्तहब आहे (अर्थात करणे बेहतर आहे )

2.       वाजिब ( आवश्यक) -

तवाफ करण्यासाठी वुज़ू आवश्यक आहे ( काही विद्वान ह्याला फर्ज म्हणतात तर काही काहींच्या मते ते मुस्तहब आहे ( करणे बेहतर )

3.       मुस्तहब - (इष्ट ) झोपी जाण्यापूर्वी आणि काही फर्ज अभंग्य स्थानापुर्वी करण्यास शिफारसीय आहे.[4]

 

वुज़ूचे आवश्यक पैलू

वुज़ूचे चार अनिवार्य पैलू आहेत.  कोणतीही वस्तू ज्यामुळे त्वचेपर्यंत पाणी पोचत नाही (जसे अंगठी ) हे काढून ठेवणे आवश्यक आहे जेनेकरुन वुज़ू करताना त्वचा पूर्णपणे ओली होते आणि वुज़ू व्यवस्थित होते

 

1.       शुद्ध पाण्याने एकदा चेहरा धुणे.लांबी अनुसार चेहरा कपाळाच्या केसरेषा पासून ते हनुवटी खाल  पर्यंत आणि रुंदीनुसार एका कानाची पाळी पासून दुसऱ्या कानाच्या पाळी पर्यंत .

2.       हात कोपऱ्या पर्यंत धुणे

3.       ओले हात एकदा डोक्याच्या एक चतुर्थांश पर्यंत

4.       पाय एकदा घोट्यापर्यंत धुणे [5]

 

ज्या गोष्टींमुळे वुज़ू मोडते /रद्दहोते

 खालील क्रिया वुज़ू मोडण्यास कारणीभूत ठरतात

1.       मूत्र, विष्ठा किंवा वारा जसे कोणत्याही स्वरूपात

2.       खाजगी भागासदरम्यान कपडIन ठेवता स्पर्श करणे

3.       गाढ झोप जशी एक बेशुद्धावस्थेत मन आणि अजाणतेत खाजगी भागातून वरIकिंव्हा विष्ठा बाहेर पडणे

4.       वेडेपणा किंव्हा नशे मुळे बेशुध्दअवस्था

5.       उंट 'मांस खाल्यामुळे

6.       स्वमतत्याग [6] [7]

 

अभ्यंगस्नान -  प्रतिबंधात्मक आणि उपचारीक चमत्कार

 डॉ मागोमेडोव यांच्या मते  चीनी औषधांमध्ये 700पेक्षा जास्त केंद्रे आहेत,ह्यांपैकी  ६६ सहासष्ट जलद प्रतिक्षेप थेरपीचा प्रभाव आहे.त्याचे नाव तीव्ररेचक(किंवा आक्रमकता किंवा पुरातन किंवा प्रधान-घटक)स्पॉट्स असे आहे

 या ६६ स्थळां पैकी  ६१ अभ्यंगस्नान (वुज़ू ) हे आवश्यक झोन मध्ये स्थित आहेत आणि बाकी ५  पायाचाघोटा आणि गुडघा दरम्यान स्थित आहेत,

 त्यामुळे, अभ्यंगस्नानIमुळे  त्यांच्यात थर्मल आणि शारीरिकउर्जा उत्तेजित होते आणि हैड्रो(water ) मसाज मुळे औष्णिक आणि शारीरिक उर्जा उत्तेजित होते.

डॉ मागोमेडोव यांच्या अभ्यासक्रमात त्यांनी हा शोध लावला कि मुस्लिम लोक जी ५ वेळा नमाज साठी वुज़ू  करतात ते ह्या प्रकीयेमुळेत्यांना फक्त आध्यात्मिकच नाही पण शारीरिक फायदा आणि उपचार परिणाम हि होतो .

·         अभ्यंगस्नान, त्वचा कर्करोग ह्यास  प्रतिबंधित ठरते ---

त्यांनी  ह्यासाठी दिलेले  स्पष्टीकरण असे  आहे कि ," अभ्यंगस्नाना मुळे जे शरीराचेभाग धुतले जातात ते प्रदूषणास  जास्तीत जास्त उघडे असते . हे प्रदूषण घामामुळे जसे शरीराच्या अंतर्गत पासून किंव्हा बाह्य .

अभ्यंगस्नानहे, प्रदूषण पाच वेळा काढून टाकतं , आणित्यामुळे त्वचा स्वच्छ ठेवते.ज़ेनेकरुन त्वचेखालील पेशी  योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात

 तसेच, पाण्याने धुतल्यामुळे रक्तवाहिन्यांना ताकत मिळते तसेच नसा आणि ग्रंथी यांनाही  ताकद  आणि मदत होते .त्यामूळे त्यांना कार्यक्षमतेत आणि  त्यांचे  कार्ये करण्यास मदत करते   .

 [सालेम, मुख्तार, प्रार्थना: जीव आणि शरीर, कैरो एक खेळ, अरब आधुनिक केंद्र (1990), पेज. 52] [8]

 

 कोरडे  अभ्यंगस्नान( तयम्मुम)  (Tayammum)

  एक पर्याय म्हणून तयम्मुम करून आपण आपली उपासना /नमाज हेकार्य करू शकता .

जेव्हा

1.       एखादी व्यक्ती पाणी शोधू शकत नाही, किंवा उपलब्ध असलेले पाणी अपुरे आहे.

2.       पाणी मिळण्यास काही मार्ग नाही

3.       एखादी  व्यक्ती पाणी  नंतर वापरण्यासाठी बचत  करत आहे.

4.       एखादी व्यक्ती आजारी आहे आणि पाणी वापरू शकत नाही.

5.       पाण्याचा वापर हानी-कारक ठरेल  किंवा पाण्यामुळे  आजार  वाढण्याची संभावना आहे किव्हा उपचारात  विलंब होण्याची शक्यता आहे. [9]

 

संदर्भ

 [1] http://www.islamweb.net/emainpage/index.php?page=articles&id=92744

 [2] www.sunnah.com/

  [3] http://www.1ststepsinislam.com/en/how-to-perform-ablution.aspx

  [4] http://www.wimuk.com/education/wudu.html

 [5] http://www.islamweb.net/emainpage/index.php?page=articles&id=92744

  [6] http://abdurrahman.org/tahara/HowtoMakeWudhuAblution-SalehasSaleh.pdf

 [7] http://islam1.org/how_to_pray/wudu.htm

 [8] http://www.answering-christianity.com/ablution_wisdom_and_miracle.htm

  [9] http://islam1.org/how_to_pray/ghusl.htm

293 Views
आम्हाला ठीक करा, किंवा स्वत:ला ठीक करा.
.
Comments
सुरुवातीचा पान