उपवास

अल्लाहचे अनंत उपकार आहेत आपण गुलामांवर कि त्याने काही खास विशिष्ट ऋतू निवडले आहे जेव्हा एखाद्याचे हसनात (चांगल्या कामांसाठी मिळणारे बक्षिसे) यांचा गुणाकारहोतो,  आणि सय्यिआत      (वाईट कामांचा)  भागाकार होऊन त्यासाठी माफी मिळते. लोकांचे रुतबे उंचाविले जातात आणि त्याच्यावर विश्वास करणारांचा हृदयआपल्या निर्मात्याकडे धाव घेतो ज़े स्वतः शुद्धीकरण करतात तेच यश प्राप्त करतात आणि जे भ्रष्ट करतात स्वत:ला  अपयशी ठरतात. अल्लाहने आपला निर्माण त्याच्या पूजेसाठी केले आहे. आणि ह्या पूजेचे एक महत्वाचे महान कृत्ये उपवास,जे अल्लाहने आपणांवर फर्ज(सक्तीचे,आवश्यक असणारा) केले आहे

 

सामग्री

सियाम  (उपवास) -  भाषिक/ शाब्दिक व्याख्या

अरबी मध्ये सियामचे शाब्दिक अर्थ स्वत:ला रोकने, बंधन घालणे असे आहे

 

इस्लामिक परिभाषा

एकदा का मनातून इच्छा व्यक्त केले ( नियत केले ) कि सूर्योदयापासून सुर्यास्त होईपर्यंत काही गोष्टी ज्याकारणास्तवउपवास मोडला जातो व्यर्ज(टाळणे)करणे .

सु बक़रह २:१८३ : निरीक्षीकरणअल सियाम ( उपवास )  तुमच्यावर आवश्यककेले गेले आहे जसे ते तुमच्या आधीच्या लोकांवर केले गेले होते, ज्यामुळेतुम्ही मुत्तक़ि (पाप करण्यापासून वाचणारा/धार्मिक) व्हाल..

अल्लाह आपल्या गुलामांना उपवास ठेवण्याचे प्रोत्साहन करतो." उपवास तुमच्या हिताचे आहे जर तुम्ही ते जाणून घ्याल " सु बक़रह २ ; १८४

त्याने लोकासाठी उपवास प्रिय आणि सोपे करून दिले आहे म्हणजे त्यांना त्यांच्या सवयी जे नित्याच्या आहेत ते सोडणे सहज होईल. अल्लाह म्हणतो ," एका विशिष्ट संख्येच्या दिवसांसाठी " सु बक़रह २: १८४

तो त्यांच्यावर दया करतो व त्यांना संकटांपासून आणि अडचणींपासून दूर ठेवतो. अल्लाह म्हणतो , " तुम्ही कोणीआजारी किंवा प्रवासात असाल तर जे चुकतीलतेउपवास तुम्ही नंतरच्या दिवसात करा .सु बक़रह २ : १८४

 

दीस

 अबू हुरैरःर.अ.म्हणतात कि  अल्लाह चे  देवदूत पै मुहम्मद स व स म्हणाले कि, " रमज़ान तुमच्या पर्यंत आले आहे, जो एक आशीर्वादाचा महिना आहे.  ह्या महिन्यात उपवास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे असे आपणास अल्लाहने सांगितले आहे . ह्या  महिन्यात स्वर्गातील दरवाजे उघडे आहेत आणि नरकाचे द्वार बंद. जे सर्वात गर्विष्टभुते(राक्षस/सैतान)ह्या काळा दरम्यान बांधले गेले आहेत. ह्या महिन्यातील एक रात्र अल्लाहने आपणास अशी दिली आहे कि ती एक हजार महिन्यापेक्षा श्रेष्ठ/चांगलीआहे ज़ो कोणी ह्या वेळेचा, किव्हा यारात्रीचा फायदाघेत नाही तो खरोखरच वंचित आहे आपल्या वाटेला भलाई घेण्यापासून. ( हदीस सुनन अल नासायी १९९२ आणि अल आबांनी - सही अल तर्घीब व अल तर्हीब ९८५ )

अबू हुरेरः र.अ.म्हणाले कि अल्लाहचेपै.मुहम्मद स व स यांचे म्हणणे आहे कि, " रमज़ान महिन्याच्या पहिल्या रात्री भूत(राक्षस/शैतान)आणि सर्वात प्रतीभाशाली आणि गर्विष्ठ जिन्न यांना बंदिस्त केले जाते. आग मध्ये शोकून देणारे दरवाजे बंद केले जातात आणि त्याचे एकही द्वार उघडे ठेवले जात नाही. स्वर्गाचे दार उघडले जातात आणि त्याचे एकही द्वार बंद केले जात नाही. एक पुकारणारा आवाज देईल ," कोणी आहे ज्याला भलाई कमवायची आहे, पुढे या ! आणि ओ वाईट साधणारे, थांबा !  " प्रत्येक रात्री ह्या महिन्याच्या अल्लाह आगीत हुकुमाविलेल्या लोकांची गर्दने आगीपासून मुक्त करतो.( हदीस  सहिः-   शेख. अल आबांनी  ५३९ तिर्मिजी)

 

उपवासासंबंधी नियम

(इस्लामी राष्ट्र) उम्मः यांनी करार केले आहे कि रमज़ानच्या महिन्यात उपवास ठेवणे आवशक आहे आणि ह्याचा पुरावा, कुरआन सु बक़रह २:१८३ : ओ तुम्ही जे विश्वास करतात निरीक्षीकरण अल सियाम( उपवास )  तुमच्यावर आवश्यककेले गेले आहे जसे ते तुमच्या आधीच्या लोकांवर केले गेले होते, ज्यामुळेतुम्ही मुत्तक़ि (धार्मिक) व्हाल.

मुहमम्द स व सयांनी म्हंटले आहे, इस्लामचे ५ स्तंभ आहेत आणि त्यापैकी एक रमज़ानउपवास आहेत.( सही बुखारी : १/८)

 

उपवास गुण विशेष

 उपवासाचे गुण विशेष नक्कीच महान आहेत आणि एका हदीस अनुसार म्हंटले आहे कि,  अल्लाहने उपवास त्याच्यासाठी म्हणून निवडले आहेयानी म्हणूनच त्याचा मोबदला, प्रतिफळ किव्हा बक्षिसतो देणार आणि ह्या बक्षिसाचे गुणाकार करून, वाढवून तो आपणास देणार. ह्याचे हिशोब लावणे हि कठीण आहे.  हदीस एक़ुद्सि मध्ये म्हंटले आहे,  " शिवाय उपवास जे फक्त माझ्यासाठी आहे, आणि त्याचे प्रतिफळ मी देणार.( हदीस अल बुखारी अल फाथ १९०४ , सहॆह अल तर्गीब१/ १४०७

 

Ø  हदीस अल निसाई ४/१६५ _ उपवासाच्या तुलनेत काही नाही.

Ø  उपवास  ठेवणाऱ्या  व्यक्तीची प्रार्थना आणि याचना (दुआं) नाकारली जाणार नाही .( अल बय्हक़ि ३/३४५ : अल सिल्सिलात अल सहिह १७९७)

Ø  उपवास  ठेवणाऱ्या  व्यक्तीसाठी २ असे शान आहेत कि त्याचा आनंदाची परिसीमा असणार .

१) तो जेव्हा उपवास खोलतो (म्हणजेच इफ्तार)आणि

२) जेव्हा तो आपल्या परमेश्वरा पुढे उभे राहील आणि आपल्या उपवासाबद्दल त्याला अत्यंत आनंद

होईल . ( हदीस मुस्लिम २/८०७)

Ø  कियामत च्या दिवशी जेव्हा प्रत्येकाचे हिशोब होईल, उपवास मध्यस्थी करेल आपल्यासाठी जेणे भूक, तहान आणि शारीरिक वासनांपासून स्वत:ला वंचित ठेवले ( हदीस अहमद२/१७४,तर्गीब१/४११

Ø  एक उपवास  ठेवणाऱ्या व्यक्तीच्या तोंडाला येणारे  वास अल्लाहला कस्तुरी (मुश्क) अत्तर पेक्षा अधिक प्रिय आहे.( हदीस  मुस्लिम, २ /८०७.)

Ø  उपवास एक संरक्षण  आहे आणि एका व्यक्तीला  आगि  पासून सुरक्षित ( अहमद २/४०२ , सहिः तर्गीब १/४११, सहिः अल जमि ३८८०)

Ø  जो कोणी एक दिवस देखील फक्त परमेश्वरासाठी म्हणून उपवास ठेवील त्याच्या पासून आग  सत्तर वर्षे अंतरावर दूर केली जाईल  (. मुस्लिम, 2/808करून अहवाल-)

Ø  जो कोणी एक दिवस देखील फक्त परमेश्वराची मर्जी हासील(मिळविण्यासाठी)करण्यास उपवास ठेवेल आणि जर का त्या दिवशी त्याच्या आयुष्याचा शेवट होईल तर त्याला स्वर्गात प्रवेश मिळेल ( अल अहमद ५ /३९१  , तर्गीब १/४१२

Ø  नंदनवनात  एक द्वार आहे " अल रय्यान ".  जी लोक उपवास(रोज़ा)करतात त्यांना त्या द्वारातूनप्रवेश मिळेल, त्यांच्याशिवाय दुसर्या कोणालाही त्या द्वारातून प्रवेश मिळणार नाही.एकदा  का त्यांचे प्रवेश  झाले  कि ते बंद करण्यात येईल . ( अल बुखारी फ़त: १७९७ )

Ø  रमज़ान इस्लामचे एक खांब आहे,  या महिन्यात कुरआन प्रकटझाले  आणि  ह्या महिन्यात एक रात्र अशी आहे कि ती  एक हजार महिन्यान पेक्षा फार श्रेष्ठ/चांगली आहे  

Ø  जेव्हा रमज़ान सुरु होते स्वर्गाचे दर उघडले जाते आणि नरकाचे बंद केले जाते,  सैतान ला साखळ्या मध्ये बंधिस्त केले जाते ( अल बुखारी फ़त: ३२७७)

Ø  रमज़ान  मध्ये  उपवास  ठेवणे १० महिने उपवास ठेवल्यासारखे आहे .( मुस्नद अहमद  ५/२८०: सहिः अल तर्गीब १/४२१)

Ø  जो कोणी  श्राद्ध आणि ह्या विश्वासाने कि अल्लाह आपल्याला ह्याचे प्रतिफळ देईल उपवास ठेवतो त्याचे सर्व मागील पाप क्षमा केली जाईल ( अल-बुखारी , फत:,. ३७ )

Ø  प्रत्येकउपवास जेव्हा सोडला जातो त्या वेळी अल्लाह ज्या लोकांची आगि पासून मुक्तता करायची असेल त्यांची निवड करेल ( अहमद ५/२५६, सहिः तर्गीब १/४१९)

 

उपवासाचेफायदे

Ø  उपवास  ठेवण्यामागे अत्यंत ज्ञान,  खूप शहाणपण आणि असंख्य फायदे आहेत, ज्याचा संबंध तक़वा बरोबर आहे," ज्यामुळेतुम्ही अल मुत्तक़ि व्हाल " -(  कुरआन अल बक़रह २/ १८३ )

Ø  ह्या आयात चा अर्थ असा कि ," जर का कोणी व्यक्ती अल्लाहच्या मर्जीसाठी, त्याला खुश करण्यासाठी आणि त्याच्या शिक्षेच्या भितीने, कायदेशीर गोष्टींचा त्याग करू शकतो तर त्या व्यक्तीला बेकायदेशीर किव्हा चुकीच्या कामा पासून परावृत्त करणे ( स्वत:ला थांबविणे ) खूप सोपे जाते ".

Ø  व्यक्तिचे पोट जेव्हा रिकामे असते आणि तो उपाशी असतो तेव्हा,  त्याच्या इतर अव्ययांनाभूक लागत नाही, किंवा इच्छाहि वाटत नाही. पण तेच जर का त्याचे पोट समाधानी आहे,  तर  त्याची जीभ, डोळे, हात आणि खाजगी भाग जागे होतात,  भुकेले होतात.  उपवास, शैतानचे(राक्षस)पराभव  करते,ते इच्छांवर  नियंत्रण ठेवते आणि शरीराच्या इतर भागांचे संरक्षण करते .

Ø  उपाशी व्यक्तीला उपासमारिच्या वेदनांची चाहूल लागते, त्याचा अनुभव होतो आणि त्याला गरीबाच्या मनस्थितीचे दर्शन होते. त्यामुळे त्याला त्यांच्या प्रती सहानुभूती वाटते आणि तो त्यांना त्यांच्या पोटासाठी काहीतर मादितीसाठी तत्परतेने तयार होतो. नुसते गरीबाबद्दल वाचून किव्हा ऐकून त्यांच्या त्रास आणि यातनेबद्दल आपण समजू शकत नाही. जो पर्यंत एखादी गोष्ट आपण स्वत अनुभवत नाही तो पर्यंत त्याची खरी कळ आणि यातना काय असते याचा ज्ञान होत नाही. उदा :  एखादी व्यक्ती जो पर्यंत पायी चालून,  चालणे काय  हे अनुभवत नाही तिला त्यात होणारे त्रास आणि अडचणींचा अंत लागत नाही

Ø  उपवास इच्छा टाळण्यासाठी आणि पाप दूर ठेवण्यासाठी व्यक्तीला एका प्रकारे प्रशिक्षण देते  जेणे करून तो पापांपासून दूर राहतो. ते  माणसाला स्वत:च्या स्वभावाचा आणि मनाचा ताबा ठेवण्यास शिकवते.तसेच  वाईट गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवण्यास मदद करते.   स्वत:ला आणि आपल्या कार्याला कसे आयोजित आणि वक्तशीर(वेळेवर)पणे करावे ह्याचा धडा   उपवास एका माणसाला देतं. काश ! सगळे हे समजो .

Ø  उपवास एक प्रात्यक्षिक आहे मुस्लिम एकजुटीचे, जसे पूर्ण इस्लामी राष्ट्र आणि प्रत्येकमुसलमान एका विशिष्ट वेळेलाच उपवास सुरु करतो आणि ते मोडतं. ही एक उत्तम संधी उपलब्ध आहे  इतरांना इस्लाम आणि अल्लाह बद्दल प्रचार करण्यासाठी .

Ø  या महिन्यात अनेक लोक प्रथमच मस्जिद मध्ये  येतात, आणि  काही लोक एका काळा नंतर.   त्यांचे  अंत: करण खुलले जाते, मनाचे द्वार उघडते . म्हणूनच ह्या संधीचा फायदा घेऊन  अत्यंत विनम्र आणि शांत सुंदर रित्या  उपदेश केले पाहिजे . आपल्या प्रवचनात योग्य धडे , शिक्षण, फायदेशीर शब्दांचा योग्य वापर करून लोकांना भलाई कडे बोलावले पाहिजे. ह्याच बरोबर चांगली कामे स्वत:केले पाहिजे आणि त्यात  सहकार्य  हि केले पाहिजे.

 

उपवासाचे नियम आणि त्याची सुन्नते 

Ø  उपवासाचे  काही पैलू फर्ज  ( आवश्यक ) आहेत आणि काही मुस्तहब म्हणजे जे करणे  पसंद केले गेलेले आहेत .

Ø  सहर अथवा सहरी (सूर्योदयापूर्वी ) -  काहीखावे आणि प्यावे,उपवास सुरु करण्या पूर्वी,आणि अगदी अज़ानहोईपर्यंत ती वेळ टाळू नये. मुहम्मद स व सयांचे म्हणणे होते, " निश्चित तुम्ही सहर करावे कारण तसे करण्यात बरकत  अर्थात आशिर्वाद आहे ( अल बुखारी फत्त : ४/१३९)

Ø  सहर अन्नात आशिर्वाद आहे आणि ते तुम्हाला दुसर्या लोकांपासून वेगळे करते,  ज्यांना देवाने पुस्तक दिले होते .

Ø  खजूर हे सहरसाठी अत्यंत सुंदर असे खाद्य आहे,विश्वास जर तुम्ही करत असाल तर . ( अबू दावूद २३४५, सहिः तर्गीब १/४४८)

Ø  इफ्तार(अर्थात रोजा खोलणे) /(तिन्हीसांजा नंतर नाश्ता) - हे देखील आपल्या वेळेत करावे आणि वेळ टाळू देऊ नये कारण मुहम्मद स व सम्हणाले, "  जो पर्यंत इफ्तार ची वेळ टळत नाही तो पर्यंत लोक चांगुलपणा वर टिकून राहतात “.(अल बुखारी फत: ४/१९८)

Ø  अनस (र अ ) यांनी सांगितलेल्या हदीस प्रमाणे व्यक्तीला  उपोषण विशिष्ट  रीतीने तोडले पाहिजे .

Ø  " पै.  मुहम्मद स व स ताज्या खजुराबरोबर आपले उपवास प्रार्थनेच्या वेळे आधी खोलायचे.(इफ्तार)ताजे खजूर जर नसेल तर सुक्या खजुराबरोबर उपवास खोलायचे, आणि जर का सुके खजुरही नसतील तर पाण्याच्या काही घोटाबरोबर उपवास खोलायचे. " ( तिर्मिजी ३/७९ )

Ø  उपवास करतानाइफ्तार वेळी जसे हदीस मध्ये नोंदविले आहे त्या शब्दांत उच्चारले पाहिजे. उमर र अ म्हणतात  मुहम्मद स  व स उपवासात इफ्तारच्यावेळी  म्हणायचे , " दहाबा अद धामा, वब तल्लतिल उरूक व थाबत अल अर्जू इन शा अल्लाह " ( अर्थ- तहान गेली,  शिरा पुन्हा वाहतात आणि प्रतिफळ मिळाल्याची खात्री जर अल्लाहची मर्जी असेल ( अबू दावूद २/७६५ ) 

 

ह्या महान  महिन्यात  केले जाणारे कार्य

 

Ø  स्वत: ला आणि आपल्या भोवतालीचे  वातावरण तयार करा

Ø  पश्चात्ताप आणि अल्लाह कडे धाव घेण्याची घाई करा 

Ø  या महिन्याच्या स्वागताचे आनंद व्यक्त करा .

Ø  उपवास व्यवस्थित पणे करा

Ø  मनाची योग्य तयारी आणि मनस्थिती तयार करा आणि अल्लाहचे भय मनात बाळगावा तरावीहची नमाज पडताना

Ø  महिन्याच्या मधल्या दहा दिवसांत कंटाळू नका

Ø  लैलतुर क़द्र– (रात्र; जी हजार महिन्यापेक्षा मौल्यवान/श्रेष्ठ आहे)शोध घ्या

Ø  संपूर्ण कुरआन पुन्हा पुन्हा वाचा,  तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू द्या ते वाचताना आणि आपण काय वाचत आहात समजून घेण्याचे प्रयत्न करा .

Ø  रमज़ान मध्ये केले गेलेले उमराह हे मुहम्मदस व सयांच्याबरोबर केल्या सारखेसमतुल्य आहे.

Ø  या चांगल्या वेळी केलेले धर्मादाय अधिक गुणकार आहे..

Ø  ए-तेकाफ ( मस्जिद मध्ये राहून केली जाणार्री जोपासना आणि प्रार्थना ) हि एक सुन्नत आहे

Ø  महिन्याच्या सुरूवातीस एकमेकांना अभिनंदन करण्यास चूक काहीही नाही.  मुहम्मद    स व सआपल्या साथीदारांना रमज़ानच्या आगमनाची बातमी इतरांना द्यायचे प्रोत्साहनकरत आणि त्यांना ह्या महिन्याचे भरपूर फायदा घ्यायला सांगत.

Ø  अबू  हुरैरः म्हणतात कि पै. स व सयांचे म्हणणे आहे कि , " रमज़ान एक आर्शिर्वादाचा महिना तुमच्या पर्यंत पोचलं आहे अल्लाहने  ह्या महिन्यात उपवास आवश्यककेले आहे . ह्या महिन्यात नंदनवनाचा दरवाजे उघडले आहे आणि नरकाचा दरवाजे बंद करण्यात आले आहे . ह्या महिन्यात एक रात्र अशी आहे कि ती हजार रात्रीं पेक्षा अधिक मौल्यवान/श्रेष्ठआहे. आणि जे कोणी ह्यापासून वंचित राहील त्याने खरचएक मोठे पुण्य गमाविले आहे .  

( अल निसाई४/१२९ : सही अल तर्गीब १/४९०)

 

पहा: 

शहदह ; सलाह ; जकात ; हज् ; उपवासाचे  गुपित ; इस्लाम आणि इतर धर्मातल्या उपवासाचे फरक ;  उपवासाचे गुण आणि ज्ञान.

 

संदर्भ:

शेख मुहम्मद Salih उल- Munajjid यांनी लिहिलेले,   http://d1.islamhouse.com/data/en/ih_books/single/en_Matters_Related_to_Fasting.pdf

710 Views
आम्हाला ठीक करा, किंवा स्वत:ला ठीक करा.
.
Comments
सुरुवातीचा पान