इस्लामिक तत्व

इस्लामिक तत्व हे निर्मात्याने स्वत: लागू केलेले नियम आणि विश्वास संच आहे. हे कोणताही गट, प्रदेश, क्षेत्र किंवा जात ह्यासाठी निश्चित नाहीत. पण ते संपूर्ण मानवजातीसाठी पाठविण्यात आले आहे . "इस्लाम" हा शब्द अराबिक आहे. त्याचे अर्थ, ”शांती उपभोगणे,आपली इच्छा हि अल्लाहच्या इच्छा अनुसार अर्पण/ सदर करूने”. तर,इस्लामचे तत्वम्हणजेच, अल्लाहची इच्छा. जे त्यांनी संपूर्ण मानवजातीला संबोधिले आहे आणि हाच संदेश घेऊन मुहम्मद ﷺह्याशेवटच्या संदेशकर्ताला ह्या जगात पाठविले होते. इस्लामच्या तत्वांचे वैशिष्ट्य म्हणजे हीतत्व स्वतः निर्मात्याने लागू केले आहेत आणि हे सर्व माणसाच्या स्वभावानुसार आणि नैसर्गिकरीत्या आहेत,जेणेकरून मनुष्य जन्माला आले .

 

सामग्री

देवाचा  एकोपा

 तो दोघांपैकी एक किव्हा तिघांपैकी एक असे काही नाही. ह्याचे अर्थ इस्लाम त्रिदेवत्वचीकल्पना, किव्हा एकापेक्षा अधिक देव असणे हे कल्पना पूर्णपणे नाकारतो .

अल्लाह, सर्व स्तुति ज्याची, कुरआन मध्ये म्हणतो कि," तो एक आणि फक्त एक आहे.

(सुर इख्लास ११२/१ )

 

मानवजातीचा एकोपा

  देवाच्या नियमशास्त्रा समोर लोक समानतेने बनवण्यात आली आहेत. कोणत्याही जातीला दुसर्यावर श्रेष्ठत्व दिले गेले नाही.अल्लाहने आपणास विविध रंग, देश, भाषा आणि समजुतीच्या मानाने भिन्न / वेगळे केले आहे. जेणेकरून आपली परीक्षा घेण्यात येईल,कोण-कोणापेक्षा श्रेष्ठ; कोणीही असा दावा करू शकत नाही कि तो इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. ते फक्त देवालाच माहित आहे. आणि ह्याची चाचणी एखाद्याच्या भक्तीभावर आणि त्याच्या चांगुलपनावर निर्धारित आहे.(सुर हुजरात ४९/१३)

 

संदेशवाहक आणि त्यांच्या संदेश चा एकोपा.

 आम्ही मुस्लिम हा विश्वास ठेवतो कि अल्लाहने मानवजातीच्या इतिहासात विविध दूत पाठवले.सर्व समान संदेश आणि शिकवण घेऊन आले. गैरसमज आणि चुकीचा अर्थ हा लोकांनी लावला .(सुर आंबिया २१/२५)

आपण मुस्लिम संदेष्टा नूह अलैसलाम, इब्राहीम, याकुब, मुसा, दाऊद, येशु आणि मुहम्मद संदेष्टा खरे तर इस्लामचे संदेष्टा आहेत.

 

देवदूत आणि अभिप्राय / न्यायाचा दिवस .

आम्ही मुस्लिम लोकांचा विश्वास आहे कि अल्लाहने विविध असंख्य प्राणी निर्माण केलेले आहेत (जसे देवदूत ज्यांना अल्लाहने विशिष्ट मोहिमा साठी निर्माण केले ).

आपला हा विश्वास आहे कि, पृथ्वीवरील मानवजातीच्या जीवनाच्या निर्माणाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत  इतिहासात असलेले सर्व लोकांना न्याय दिवशी एकत्र जमा करण्यात येणार आहे आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने न्याय होईल.प्रत्येकाला त्याचा हिशोब, बक्शिश(माफ करणे)किव्हा शिक्षादेण्यात येईल .(सुरIजील्जाल-९९/ ७&८ )

 

जन्मजात माणसाचा निरागसपणा -

आपण मुस्लिम हे मानतो कि प्रत्येकमनुष्य पाप मुक्त जन्माला येतो. वयात आल्यानंतर आणि चुका झाल्यानंतरच त्यांना ती चुकआकारली जाते. कोणीही दुसऱ्याच्या पापांसाठी जबाबदार नाही अथवा कोणीही दुसऱ्याची चूक स्वतःवर घेऊ शकत नाही .

तथापि खऱ्या श्रद्धेने, याचीकेने आणि मनापासून मागितलेल्या क्षमा साठी देवाचे दार नेहमीच उघडे आहे .

 

राज्य आणि धर्म-

 आम्ही मुस्लिम हा विश्वास ठेवतो कि इस्लाम हाच एक आणि  संपूर्ण जीवनाचा  मार्ग आहे.जीवनाचे सर्व पैलू त्यात आहेत. किंबहुना इस्लामचे शिकवण राजकारण आणि धर्म ह्यामध्ये फरक करत नाही. म्हणून, राज्य आणि धर्म हे दोन्ही अल्लाहची आज्ञा,    पालन करण्यात आहे  (इस्लामच्या शिकवनातून).त्यामुळे, आर्थिक आणि सामाजिक व्यवहार, देखील इस्लामच्या शिकवणीचा  एक भाग आहे

 

इस्लाम चे खांब/स्तंभ

अल्लाहचे आदेश आहेकि ज्याच्यावर विश्वास आहे त्या आज्ञेचे पालन करा .

इस्लामचे  पाच खांब आहेत.

 

1.      मार्ग (शहादः)

इस्लामचे मार्ग हे मानण्यात  आहे कि शाब्दिक बांधिलकी आणि वचनाने  देव फक्त एक  आहे आणि  मुहम्मददेवाचे दूत आणि संदेश करता आहेत.

2.      प्रार्थना (सलाह/नमाज़)

वयात आल्यानंतर प्रत्येक मुस्लिम स्त्री किव्हा पुरुष यांचे हे कर्तव्य आहे कि विशिष्ट  पाच वेळा दिवसा आणि रात्री नमाज पढने अनिवार्य आहे .

3.      सक्तीचे दान  ( जकात )

मुस्लीमच्या मालमत्तेतून वार्षिक रित्या विशिष्ट रक्कम /टक्केवारी, विशिष्ट अटी पूर्ण झाल्यानंतर गरीब किंवा इतर लोक जे ह्याचे हकदार आहेत, यांना देणे अनिवार्य आहे

4.      उपवास (सौम/रोज़ा)

उपवास म्हणजे सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत अन्न, द्रव आणि लैंगिक संबंध (विवाहित जोडप्यांन च्या  दरम्यान) यापासून पूर्णता वर्जन  करणे

5.      तिर्थक्षेत्र (हज)

आर्थिक रित्या सोयीस्कर असेल तर आयुष्यात एकदा तरी हज तीर्थस्थान करणे आवश्यक आहे.संदेष्टा इब्राहीम अ स त्यांची पत्नी ‘हागार’आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र आणि संदेष्टा ‘इस्माईल‘अ स यांनी भोगलेल्या कठीण परिस्थितीचे, दुख आणि चाचण्यांचे एक स्मृती चिन्ह आहे.

 

विश्वासाचे  खांब.

 

इस्लाम मध्ये , विश्वासाचे  सहा खांब आहेत. 

विश्वास -अल्लाहवर,देव्दुतांवर, मानवजातीसाठी त्यांनी प्रकट केलेल्या पुस्तकांवर,संदेष्टांवर आणि दुतांवर, न्यायाच्या दिवसावर, आणि नियतीवर

 

1.    अल्लाहवर विश्वास -

इस्लाम हे शिकवते कि, देव हा फक्त एकच अद्वितीय आहे. त्याची उपासना आणि त्याचीच आज्ञा पाळली पाहिजे .

           2.        देव्दुतांवर विश्वास( मलाइका )

मुस्लिम लोक हा विश्वास ठेवतात कि अल्लाहने असे प्राणी निर्माण केले आहेत जे आपल्या नजरेस येत नाही, जसे देवदूत ( मलाइका). मुस्लिमलोकांचा विश्वास  त्यांच्या अस्तित्त्वावर, त्यांच्या नामांवर, कार्यांवर आणि त्यांचे वर्णन जसे कुरआन मध्ये आणि मुहम्मदयांच्या सुन्नत मध्ये नमूद केले आहे .

        3.        अल्लाह ने प्रकट केलेल्या पुस्तकांवर विश्वास-

मुस्लिम हा विश्वास ठेवतात कि अल्लाहने वेळोवेळी मानवजातीसाठी पुस्तके प्रकट केली.या सर्व पुस्तकांचे मूळ त्याच दैवी स्त्रोतपासूनआहे.ते सर्व दैवी साक्षात्कारही आहेत.ते प्रकट झाले तेव्हा त्या पुस्तकांची मूळ मजकूर वर विश्वास आहे.

 प्रमुख दैवी पुस्तके आहेत:

1)      झबूर प्रेषित दावूद अ स यांच्या वर  प्रकट झालेले

2)      तौरातप्रेषित मुसाअ स यांच्या वर  प्रकट झालेले

3)      इंजील प्रेषित इसाअ स यांच्या वर  प्रकट झालेले

4)      कुरआन प्रेषित मुहम्मदयांच्या वर  प्रकट झालेले

 

      4.   अल्लाहच्या संदेष्ट्यांवर(नबी)विश्वास

सर्व मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी  अल्लाहने संदेष्ट्यांना पाठवले हा विश्वासमुस्लिम करतात. त्यांचे अस्तित्व, त्यांची नावे,  त्यांच्या संदेशावर  विश्वास,जसे अल्लाहने आणि मुहम्मद यांनी आपणास सांगितले आहे. संदेष्टा..,ह्यांना काही दैवी शक्ती नसते, सर्व शक्तिमान फक्त  अल्लाह. अल्लाहने जे काही त्याच्या संदेष्टाना दिले तेवढीच क्षमता त्यांना असते.

 

   5.    यौम अल- क़ियमा मध्ये विश्वास (अभिप्राय दिवस)

मुस्लिम लोकांचा हा विश्वास आहे कि सर्वकाही एके दिवशी नष्ट करण्यात येणार आहे.     प्रत्येक व्यक्तीचावैयक्तिकरित्या अल्लाह न्याय करणार.त्यIने जीवनात केलेल्या त्याच्या चांगल्या किंवा वाईट क्रियानुसारकेले आहे आणि प्रत्येक दोषी असलेल्याला त्याचे  / तिचे  अधिकार देण्यात येईल. नीतिमानजीवन जे जगून आले त्यांना अल्लाह नंदावानात(जन्नत)पाठवून चांगली कामे करण्या बद्दल प्रतिफळमिळेल.

  6.       क़द्र (नशीब, दैवी संदेश)

मुस्लिम लोकांचा विश्वास आहे की संपूर्ण विश्व हे पूर्णपणे अल्लाहच्या नियंत्रणात आहे,  अल्लाह त्याचा संचालित आहे, त्यामुळे जे काही मोठी अथवा लहान कामगिरी /कार्य  या विश्वात घडते ते सर्वकाही अल्लाहच्या शासित आहे. पूर्णपणे अल्लाहवर विश्वास ठेऊन  प्रामाणिकपणे प्रयत्न,  सर्वोत्तम कामगिरी करत राहणे आवश्यकआहे. अंध श्रद्धा आणि आळशीपणIमुळेकोणत्याही गोष्टीमध्ये मागे राहू नये. हा विश्वासमाणसाला प्रचंडआत्मविश्वास,निश्चितता आणि मन शांती देते.विशेषत: दुः खाच्या आणि संकटाच्या वेळी.

 

हे सुद्धा पहा:

ला इला  हा इल लल लाह चे अर्थ ,

अक़िदा ए तौहीद, इस्लामचे खांब , ईमान चे खांब, जीवनाचा हेतू, शिर्क 

 

संदर्भ

 http://islamicbulletin.org/newsletters/issue_24/beliefs.aspx

703 Views
आम्हाला ठीक करा, किंवा स्वत:ला ठीक करा.
.
Comments
सुरुवातीचा पान