अल्लाहचे हक्क

ही गोष्ट सदैव लक्षात ठेवली पाहीजे की, अल्लाहचे हक्क त्य़ाच्य़ा र्निमितीवर सर्वात जास्त आहे.

अल्लाह ( सर्व तारीफ व स्तुति त्याच्यासाठी), तो एकमेव र्निमिता व पालनकर्ता पूर्ण सृष्टीचा. तोच सर्वक्षेष्ठ ज्याने सर्वकाही विचारपुर्वक बनविले. अल्लाह ( सर्व तारीफ व स्तुति त्याच्यासाठी) तो, ज्याने सर्व सृष्टी अगदी शुन्यापासून बनवली. आईच्या गर्भात मुलाचं पालन करणारा तोच तो. तोच वयाच्या प्रत्येक पायरीवर राखण करणारा. तोच एकमेव पालणारा, पोसणारा .

 

आशय

·

कुरआऩ

अल्लाह ( सर्व तारीफ व स्तुति त्याच्यासाठी) म्हणतो, ( अर्थ), "आईच्या गर्भातातून आम्ही अल्लाहने आईच्या गर्भातातून तुम्हास बाहेर आणले, तुम्हास ते ठाऊक हि नाही त्यांनी तुम्हांला ऐकण्याची, पाहण्याची शक्ती दिली. आभार मानण्या करिता हृदय दिले ". ( सु नाहल १६:७८ )

जर का अल्लाहने ( सर्व तारीफ त्याची ) माणसाचे पालन पोषण नकार केले तर त्वरित नाश होईल. अल्लाहची दया आहे जी मानवाला आणि इतर सर्व जीविताना जिवंत ठेवते.

 

हदीस

अल्लाहच्या धर्मप्रचारक यांनी नमूद अथवा त्यांना महान पाप बद्दल विचारले . ते म्हणाले , " देवाची उपासना आणि त्याला भागीदार व त्याच्या बरोबरीने दुसऱ्या कोणाची पूजा करणे " स बुखारी ८:८. म्हणून मानवाचे अधिकार अल्लाहवर हे आहेत कि त्याच्या बरोबरीने किव्हा तुलनेत कोणालाही भागीदार बनवू नये

 

सामग्री/ तरतूद अल्लाहकडून

अल्लाहचे नियंत्रण गुलाम प्रती परिपूर्ण आहे.. त्याच्या उपकार अगणित आहेत. हि जर त्याची भूमिका आहे मानव जीवनात तर त्याचे अधिकार सर्वात उच्च ठेवले पाहिजेत . अल्लाह ( सर्व तारीफ त्याच्या साठी ) त्याला आपल्या गुलाम पासून भरणपोषण ची गरज नाही. तो म्हणतो , "आम्ही तुम्हास नाही प्रश्न करत भरणपोषण चा , आम्ही ते आपल्या साठी प्रदान करतो ! आणि मुत्तकी लोक ( जे अल्लाहचे भय मनात ठेवतात) त्यांना सुंदर अंत आहे . सु ताहा २० : १३२

 

निर्मिती चे कारण

अल्लाह (सर्व तारीफ त्याच्या साठी ) केवळ त्याच्या गुलाम कडून एक गोष्ट इच्छितो ." आणि मी (अल्लाह ) जिन्न अंनि मानवजातीला फक्त माझ्या भक्तीसाठी निर्माण केले. त्यांच्या कडून मला कोणत्याही पालन पोषणाची गरज नाही , आणि ना हि मी त्यांना मला भरणपोषण करण्याची अपेक्षा करतो . निशित अल्लाह ( सर्व तारीफ त्याच्या साठी ) सर्वांचा पालन करता , शक्तीचा मुळ आणि सर्वात ताकदवान आहे . (सु जरीयात ५१: ५६ -५८ )

अल्लाह (सर्व तारीफ त्याच्या साठी ) इच्छितो कि फक्त त्याची पूजा केली पाहिजे आणि त्याच्या बरोबर भक्तीत कोणालाही भागीदार ठरवू नये . खर्या अर्थ फक्त त्याचे गुलाम बनून राहावे . तो इच्छितो कि माणसाने फक्त त्याचे शरण जावे, जसे ते आपल्या जीवनासाठी व त्याच्या आधारासाठी त्याच्या शरणी जातात. योग्य आहे कि ज्याच्या हाती सर्व शक्ती आहे तोच फक्त पूजनीय आहे.

 

सर्व आशीर्वाद अल्लाहकडून

अल्लाहचे आभार मानले पाहिजे , फक्त त्याचीच पूजा करून कारणतोचि पालन पोषण करणारा आहे . अल्लाह ( सर्व तारीफ त्याच्यासाठी) म्हणतो , " जे काही उपकार तुम्हास मिळालेले आहेत अल्लाह कडून आहेत. मग जेव्हा तुम्हास नुकसान कव्हा संकट पोचतं तेव्हा फक्त अल्लाह कडेच धाव घेतली पाहिजे

(सु नाहल १६: ५३)

 

प्रामाणिकपणे प्रयत्न

अल्लाहची आपल्या गुलामकडून अपेक्षा खूप सोपी आहे ज़ि लोक घोर प्रयत्न करतात त्याला खुश करण्यासाठी व त्याच्या भक्तीची, अल्लाह त्यांना संकटात नाही घालू इच्छित. तो म्हणतो, "आणि तुम्ही (प्रामाणिकपणे) अल्लाहच्या मार्गासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली पाहिजे…इस्लाम च्या प्रचारासाठी त्याने तुमची निवड केली आहे, आणि धर्मात त्याने तुमच्यावर कुठलेही कष्ट लादले नाही. हा धर्म तुमच्या वडिलोपार्जित संत इब्राहीम अ स यांचा आहे. .तो अल्लाहच आहे ज्याने तुम्हाला मुसलमान करार केले त्या आधी आणि क़ुरान मध्ये देखील. मुहम्मद स व स साक्षी आहेत तुमच्यावर आणि तुम्ही साक्षी व्हाल पूर्ण मानवजातीवर. त्यामुळे प्रार्थना उत्तम रित्या अर्पण करा, जकात अनिवार्य रित्या दान करा, आणि अल्लाहशी आपले नाते मजबुती ने जोडा.. अल्लाह ( स्तुथि फक्त त्याची ) तोच प्रभू आहे, एकमेव उत्कृष्ट प्रभु आणि एक उत्कृष्ट मददगार (सु हज्ज २२: ७८)

 

उपासनेत प्रामाणिकपणा आणि सहजपणे

अल्लाह आपल्या कडून त्याची पूजा प्रामाणिकपणे, आणि धार्मिक कर्मे कार्यान्वीत करू इच्छित आहे. दिवसातून ५ वेळा नमाज हि त्याचाकडून आपणास क्षमा देते आणि हृदयात पवित्रता आणते. .प्रतेक मुसलमानांनी उत्कृष्ट रित्या नमाज अर्पण केली पाहिजे . " म्हणून अल्लाहची भीती मनात बाळगावा जेवढी तुम्ही बलागावू शकता .( सुतगाबुन६४: १६ )

प्रेषित मुहम्मद " उभे राहून प्रार्थना करा, न जमल्यास बसून करा आणि तरीही न जमल्यास तर झोपून त्याची प्रार्थना करा ( बुखारी व्हॉ.२ : २१८ )

अल्लाह ( सर्व स्तुती त्याच्यासाठी ) आपल्या गुलामकडून हे इच्छितो कि तो आपल्याजवळ असलेल्या संपतीतून दुसर्यांना किंचित मदद करो. जे गरीब ज्यांच्या कडे पैसा नाही, गरजू, असहाय्य लोक, प्रवाशी ज्यांना अडचण आहे , कर्जदारांचा कर्ज फेडण्यासाठी, जकातीच्या पैश्याचा वापर करावा. आणि हि सर्व लोक जकातीचा पैसा घेण्यास पात्र आहेत .. जकातीची रक्कम इतकी शुल्लक आहे कि ते कोणालाही त्याच्या श्रीमंतीत हानी पोचू शकत नाही. आणि असे असून सुद्धा गरिबांना प्रचंड फायदे पुरवते.

अल्लाह ( सर्व स्तुती त्याच्यासाठी ) हे देखील म्हणतो कि रमजान च्या महिन्यात उपवास करणे आवश्यक आहे. तो म्हणतो, अनुवाद " जो कोणी पहिल्या रात्रीचा चंद्रकोर रमजान महिन्याचा पाहतो, त्याच्यावर लाझीम (अतिआवश्यक) आहे कि तो उपवास ठेवो. जर का कोणी आजारी किव्हा प्रवाशात असेल तर जितके उपवास त्याचे चुकतील तेवढ्याची भरपाई त्याने नंतर केली पाहिजे . क़ुरआन सु बक़रह २ :१८५

 

हज्

आयुष्यात एकदातरी जर जमत असेल तर हज् करणे सक्षम आहे . अल्लाहने दिलेल्या सर्व हुकुमाचा पालन करणे आणि ज्या गोष्टीचे त्याने आपल्याला बंधन घातले आहे त्यापासून दूर राहणे आपले कर्तव्य आहे . वर नमूद केलेल्या त्याच्या दिशेने केले जाणारे कर्तव्य आहेत .ते करणे काही कठीण काम नाही. प्रतिफळ जे मिळेल ते ह्या कष्ट पासून खूप मौल्यवान आहे .प्रतिफळ मोठे आहे "जो कोणी ज्वाला पासून दूर काढले जाईल तो खरच यशस्वी आहे . स्वर्गात त्याची जागा असेल . हे आपले जीवण एक फसवणूक आणि धोका आहे .( सु इम्रान ३:१८५)

 

संदर्भ

Allah’s Right, Book by Shaykh Muhammad ibn Salih al-`Uthaymeen, http://en.islamway.com/article/8761?ref=w-new

641 Views
आम्हाला ठीक करा, किंवा स्वत:ला ठीक करा.
.
Comments
सुरुवातीचा पान