शेवटच्या दिवसावर  विश्वास

 अंतिम दिवस म्हणजे पुनरुत्थानाचे दिवस,  जेव्हा प्रत्येक मानवाला त्याने केलेल्या कार्याबद्दल विचारले आणि त्यानुसार त्यांना बक्षीस किंवा शिक्षाप्राप्त केली जाईल. शेवटचे दिवस,असे त्याला म्हंटले आहे कारण तो अंतिम दिवस असणार, त्यानंतर ज्यांना स्वर्गासाठी निवडले जाईल ती सर्व नंदनवनात   कायमचे वास्तव्य  करतील आणि ज्यांचे कर्म त्यांना नरकाचे हक्कदार बनवेल ती नरक लोक कायमचे वास्तव्य करतील   [1]

अल्लाहने जे काही आपल्याला कुरआन मध्ये अंतिम दिवसाबद्दल सांगितले आहे त्यावर ठाम विश्वास,  पैगंबरस व स यांनी जे आपणास सांगितले आहे कि मृत्युनंतर काय होईल, आणि जे ठरले आहे ते होऊन राहील. अंतिम दिवसआधीचे जे चिन्ह सांगितले आहेत त्यावर विश्वास, मृत्यू आणि जेव्हा एखादीव्यक्ती मृत्युशय्येवर असते त्यावेळी होणार्या गोष्टी, मृत्यूनंतरचे गांभीर्य आणि विशेषता कबर(स्मशानभूमीत)मध्ये होणारी त्याची चाचणी परीक्षा,जी त्यासाठी आशीर्वाद किव्हा शिक्षेचे ठिकाण ठरेल. रणशिंग आणि पुनरुत्थान, पुनरुत्थानाच्या दिवसचे भयानक दृश्य जेव्हा सर्व हिशोबासाठी जमा होतील. त्याचे तपशील, नंदनवनाचे सौंदर्य आणि जे सर्वात भाग्यशाली असतील ते अल्लाहचा चेहरा पाहण्याचे भाग्य उपभोगतील नरक आणि त्याच्या गंभीर यातना, सर्वात गंभीर म्हणजे त्यांच्यात आणि प्रभूच्या मध्ये एक पडदा असेल, ते प्रभूला पाहू शकणार नाही. आणि अंतिम दिवसावर विश्वास म्हणजे जे काही सांगितले गेले आहे त्यानुसार वागणे आणि आपले कर्म करणे.

(अलाम अल -सुन्नः  अल -मान्शूरः , ११० /  शार्ह  अल -उसूल  अल-थालाथः  by  शेख इब्न  'उठय्मीन , ९८ -१०३ . [२]

सामग्री

                1. पुनरुत्थान च्या दिवसाचे विश्वास

                2. हिशोब केले जाईल ह्यावर विश्वास

कुरआन

 हे  जीवन एके दिवशी संपुष्टात येईल/ अंत होईल हा विश्वास आवश्यक आहे. अल्लाह म्हणतो, " जे काही पृथ्वीवर आहे त्याचे नाश होईल "( सुरह ५५ :२६ ).अल्लाहची मर्जी जेव्हा असेलतेव्हा हे विश्व नष्ट होईल. अल्लाह,देवदूत इस्राफीलला सूर फुंकण्याचे आदेश देतील. त्या क्षणी पृथ्वीवरील जे काही आहे त्या सर्वाचा नाश होईल.मग,अल्लाह पुन्हा आदेश देईल दुसऱ्यावेळीसूर फुंकण्याचा आणि,  त्या वेळी सर्व मनुष्य जात आपल्या थडग्यातून आपल्या शरीरासकट उठून बाहेर येईल. अगदी आदम अ स पासून चे शेवटच्या माणसापर्यंत.अल्लाह म्हणतो ,”आणि जेव्हा सूर फुंकण्यात येईल तेव्हा जे काही पृथ्वीवर आणि  आकाशात असतील ते सर्व संकुचित होऊन मरण पावेल, शिवाय ते ज्याची अल्लाहची मर्जी आहे. आणि दुसऱ्यावेळीजेव्हा सूर फुंकले जाईल,  पहा ते उभे असतील वाट पाहत (सुरह  ३९ :६८ )

 

 

अंतिम दिवसावर विश्वासाचे  तीन भाग आहेत

 

 1.    पुनरुत्थानवर विश्वास

    सूर /रणशिंग जेव्हा दुसऱ्या वेळी फुंकले जाईल पुनरुत्थान होईल.त्यानंतर, मानवजातीचा पुनरुत्थान होईल आणि आपल्या परमेश्वराच्या प्रश्नांना तोंड देण्यास ते उभे राहतील.अल्लाह  म्हणतो, ( शब्दार्थ ) “आम्ही जसे प्रथम वेळी निर्मिती केली तसेच आम्ही ते पुन्हा करू, हे एक बंधनकारक वचन आहे आणि आम्ही ते खरोखर पूर्ण करणार”( सुरह  २१ : १०४ )

पुनरुत्थान हि एक सत्य घटना आहे.ज्याचे उल्लेख कुरआन, सुन्नत, आणि एकमताने सर्व मुस्लिमने मान्य केले आहे. अल्लाह म्हणतो, ( शब्दार्थ ) , “त्यानंतर निश्चित सगळे मरण पावतील मग पुन्हा पुनरुत्थानाच्या दिवशी तुमचे पुनरुत्थान होणार आहे”( सुरह  २३ /१५ -१६ ]

पुनरुत्थानाच्या दिवसावर मुस्लिम लोकांचे एकमताने खात्री आहे. हे अल्लाहचे ज्ञान आहे आणि याची आज्ञा,किसृष्टी आणि निर्मितीला एक दिवस,त्यांच्या केलेल्या कर्माच्या हिशोबाचा असणार.  त्याचे संदेश घेऊन पाठविलेल्या दुतानंतर प्रत्येकाचा हिशोब करण्यातयेईल. अल्लाह म्हणतो ( शब्दार्थ ), “तुम्हाला काय वाटते,कि आम्ही तुमचा निर्माण एक खेळ आणि मजा म्हणून केले  ? विना काही उद्देश?  आणि काय तुम्ही आमचा कडे परत नाही येणार ? (सुरह २३/ ११५ )आणि निश्चित ओ मुहम्मद, " तो,ज्याने तुमच्यावर कुरआन लागू केले तो तुम्हाला त्याच्याकडे परत घेईल " , बोला, " माझ्या प्रभूला  पूर्ण ज्ञान आहे कोण मार्गदर्शन करतो आणि कोण स्पष्ट त्रुटी मध्ये आहे " (सुरह २८ /८५ )

 

2.हिशोब केले जाईल ह्यावर विश्वास असणे -

शेवटच्या दिवशी, गुलामाला पुरस्कृत केले जाईल किंवा त्याच्या चुकांची शिक्षा दिली जाईल.हे सत्य कुरआन मध्ये, सुन्नत आणि मुस्लिम एकमतानेसिद्ध करतात.  अल्लाह म्हणतो ( शब्दार्थ)" निश्चित आमच्याकडे तुमचे परतणे असेल, आणि निश्चित आम्ही तुमचा हिशोब करू.   ( सुरह ८८/२५,२६ ).जो कोणी एक चांगले /भले कर्म घेऊन येईल त्याला दहापटीने त्याचे मोल(कर्मफळ)/क्रेडीट मिळेल. आणि जे कोणी कुकर्म /वाईट व्यवहार करून येईल त्याला त्याचा मोबदला जेवढ्यास तेवढे असेल आणि त्याचावर अन्याय होणार नाही . (सुरह ६/ १६०) आणि पुनरुत्थानाच्या दिवशी न्याय तराजू लागू करण्यात येईल जेणेकरून कोणावरही काहीही अन्याय होणार नाही आणि मोहरीच्या दाण्याएवढ्या वजनाचे कर्म देखील तोलले जाईल आणि त्यानुसार  हिशोब होईल. आम्ही पुरे आहोत हिशोब देण्याकरिता ( २१/४७)

 

(अनुवाद ) पैगंबरमुहम्मद (सल लल ला हु अलैहि व सल्ल्म ) म्हणतात," विश्वास करणार्यांना अल्लाह आपल्या जवळ आणेल, त्यांची वाईट कृत्ये / चुका इतरांसमोर जाहीर होण्यापासून अल्लाह त्यांचे संरक्षणकरेल. अल्लाह त्याला विचारेल , " तुला तुझे अमुक वाईट कृते /चुका आठवतात का ? तो होकारात्मक उत्तर देईल आणि त्याला वाटेल कि आपले नाश आता निश्चिंत आहे. अल्लाह म्हणेल, "   तुझे हे कृत्य लोकांसमोर जाहीर होण्यापासूनमी बचाव केला आणि आजमीतुला तुझ्या त्या कृत्यांबद्दल माफ करतो ".मग त्याला त्याचा कृत्यांचे / व्यवहाराचे,रेकॉर्डअथवा नोंदलेले पुस्तक देण्यात येईल. जी लोक अविश्वासकरत होते आणि जी ढोंगी होते त्यांना सर्वांसमोर बोलावण्यात येईल." हि,ती लोक आहेत ज्यांनी आपला प्रभूवर अविश्वास केला आणि मार्गदर्शनासाठी पाठविलेल्या दुतांचे अनुकरण केलेनाही. त्यामुळे अल्लाहचे शाप ह्या अन्याय करणार्यांवर होईल

( सही मुस्लिम आणि  अल बुखारी )

जो कोणी एक चांगली गोष्ट करण्याचा निर्णय करतो आणि ती पूर्ण करतो अल्लाह त्याबद्दल त्याला दहा पटीने किव्हा सातशे पटीने बक्षिश देईल, किव्हा त्याहूनही जास्त. जो कोणी एखादी वाईट कृती करण्याचा निर्णय करेल आणि ते पूर्ण करेल त्याची नोंद जेवढ्यास तेवढे होईल

 (अर्थात एक वाईट कर्म एक नोंद )  ( सही अल बुखारी , सही मुस्लिम)

 

मुस्लिम लोकांचे एकमत आहे कि हिशोब दिवस नक्की येणार हे अल्लाहच्या ज्ञानातून आहे. त्याने ग्रंथ प्रकट केले, देव्दुताना संदेशवाहक म्हणून खाली पाठविले, त्यांना स्वीकारण्याची,  अनुकरण करण्याची आणि त्यांची आज्ञा पाळण्याचे हुकम दिले. जो कोणी ह्याचे विरोधकरेल ( देवदूत आणि ग्रंथ ) त्याचाशी लढाई चे आदेश दिले;मारण्यास,त्यांची मुले, महिला आणि मालमत्तेवर जप्ती करण्याची परवानगी दिली . जर हिशोबच नसेल तर ह्या सर्वांची आज्ञा पालनात वेळ वाया घालवणे आहे. अल्लाहचे रोगप्रतिकार आहे अश्या सुखी नाटका पासून. . तेव्हा नक्की आम्ही प्रश्न करू ज्यांना ग्रंथ दिले गेले होते आणि देव्दुताना देखील. तेव्हा आम्ही संपूर्ण  कथा कथन करू  आणि खरोखर आम्ही अनुपस्थित नाही   ( सुरह ७ / ६,७)

 

 

विश्वास - नंदनवन आणि नरक

नंदनवन-

अंतिम गंतव्य आहे जो कोणी ह्यापैकी एकाचे पात्र ठरेल आणि ते अनंतकाळ साठी आहे. नंदनवन हे गंतव्य आहे,अंतिम सुखाचे ठिकाण आणि आनंद जे अल्लाहने त्याच्यावर विश्वास करणाऱ्या आणि त्याचे भय बाळगणाऱ्या लोकांसाठी तयार केलेआहे.ह्या लोकांनी जे विश्वास करायचे हुकुम होते त्यावर आणि दुतांवर विश्वास केला. ते प्रामाणिक होते अल्लाहसाठी. दुतांचे अनुकरण आणि आज्ञा त्यांनी पाळली. नंदनवन हे अल्लाहच्या अनंत बक्षिसांचे ठिकाण आहे,   जे ना कोणीडोळ्यांनी कधी पाहिलं अथवा ज्याचे उल्लंघन केले, नकोणीमनानी याची कल्पना केली असेल. हाआपार आनंद अल्लाहने त्याचावर विश्वास करणार्यांसाठी लपविले आहे )

अल्लाह, म्हणतो (अनुवाद ),”निश्चित,  सर्वात उत्तम प्राणी तो, जोअल्लाहवर विश्वास करतो , चांगले कार्य करतो. त्यांचे बक्षिस त्यांच्या परमेश्वराच्या जवळ बाग अनंत्कालाचे, ज्याच्या खाली नद्या वाहतील आणि ते त्यात कायम स्वरूपी राहतील “. अल्लाह त्यांच्यवर खुश असेल आणि ते अल्लाहवर .  हे त्याच्यासाठी जे अल्लाहचे भय बाळगतात , ( सुरह ९८/ ७,८ )  कोणत्याही व्यक्तीला माहित नाही त्याच्यासाठी आनंदाचे बक्षिस कसे असेल ( सुर ३२ /१७)

नरक–

अन्यायकारक, अविश्वास करणाऱ्या लोकांसाठी अल्लाहने हे तयार केले आहे आणि हे गंतव्य आहे अत्यंत यातनेचे, आणि शिक्षेचे आहे.  ह्या लोकांनी अल्लाहवर अविश्वास केले आणि दुतांचे अनुकरण करण्यास नाकारले.  नरकात जी शिक्षा होईलयाची कल्पना देखील कोणी करू शकणार नाही .त्यात यातनेच्या सर्व  प्रकारच्या समाविष्टीत आहे.  अल्लाह म्हणतो , ( अनुवाद ) , "    भिती बाळगा त्या नरकाची,जी अविश्वास करणार्यांसाठी बनविली आहे. ( सुर ३/ १३१)

अपराध्यांसाठी जी आग तयार करण्यातआली आहे याची भिंत असेल . ते मदतीसाठी  पुकारतील ( सुटकारा आणि पाण्यासाठी ) , पण त्यांना उकळत्या पाण्याची मंजुरी देण्यात येईल ,ज्यांनी त्यांचे चेहरे  भाजून निघतील. भयानक ते पेय आणि वाईट तो ठिकाण . ( सुरह १८/ २९)  निश्चित अल्लाहचेकोपआहे ,विश्वास न करणाऱ्या लोकांवर.आणि त्याने त्यांच्यासाठी  भयानक आग तयार केली आहे.  ते त्यात कायमचे राहतील . त्यातून त्यांची ना सुटका आहे न त्यांची कोणी मदद करेल. ज्या दिवशी त्यांची चेहरे आगीत आलटून पालटून सर्व बाजूनी भस्म केले जाईल  ते म्हणतील ,” हाय ,  अरे रे  आपण जर अल्लाह आणि त्याचा देवदूताची आज्ञा पाळली असती तर "( सुर ३३ /६४- ६६) 

 

तपशील - अंतिम दिवसावर विश्वासाची

अल्लाह आणि त्याच्या पैगंबरमुहम्मद (सल लल ला हु अलैहि व सल्ल्म ) ने आपल्याला जी सूचना दिली आहे त्या सर्वांवर विश्वास म्हणजेच   अंतिम दिवसावर  विश्वास

1.       बरझ्कजीवनावर विश्वास:  मृत्यूनंतर तेअखेरच्या दिवसापर्यंत (पुनरुत्थानाच्या दिवसापर्यंत)ची कालावधी म्हणजे ‘बरझ्क’.ह्या जीवनात विश्वास जे करत होते ते अगदी सुखमय जीवन जगतील आणि ज्यांनी अविश्वास केले त्यांच्यासाठी शिक्षा असेल. अल्लाह म्हणतो कि ," जी आग त्यांच्या समोर सकाळी व दुपारी उघड केली आहे आणि त्या घटकेला जेव्हा पुरुनास्थान चा दिवस असेल त्यावेळी फ़िरऔन चा लोकांना सगळ्यात  तीव्र शिक्षेस /जाच दिली जाईल (सुरह ४०/४६ )

2.       पुनरुत्थान वर  विश्वास :  संपूर्ण मानवजातिचे,अनवाणी, नग्न,  व सुंता नकेलेल्या अवस्थेत अल्लाह सर्वांचे पुनरुत्थान करेल.अल्लाह म्हणतो: " अविश्वास करणारे हा  ढोंग करतातकि पुनरुत्थान ( हिशीब )  केले जाणार नाही. बोल ,” होय माझ्या प्रभु, नक्कीच पुनरुत्थान होईल, नंतर आपणास  सुचित आणि परतफेड  केले जाईल  जे तुम्ही केले आणि ते अल्लाहसाठी अत्यंत सोपे आहे (सुरह  ६४ : ७ )

3.       सर्व जमा  होणार ह्यावर विश्वास: अल्लाह सर्व निर्मितीला गोळा करेल आणि त्यांचे हिशोब  घेईल.अल्लाह म्हणतो, "  आणि याद राहा तो दिवस,जेव्हा आम्ही पर्वताना अगदी धुळी सारखे पार करण्यास लावू.  आणि पूर्ण पृथ्वी एका सपाट जमिनीसारखी  होईल. आणि सगळ्यांना जमा करू, एकालाही मागे सोडून न देता.सुरह  १८ :४७

4.       लोकांना  गटागटाने अल्लाह समोर उभे राहावे लागेल, हा विश्वास: अल्लाह म्हणतो: " आपल्या प्रभु समोर त्यांना आणतील, तेव्हा सर्व लोक गटागटाने उभे राहतील. जसे प्रथम तुम्हाला निर्माण केले तसेतुम्हि पुन्हा याल.आणि  तुम्हाला वाटले आम्ही तुमच्यासाठी वचन पूर्ण करण्याची  वेळ  नियुक्ती  केली नाही ?  सुरह  १८ :४८ )

5.       आपले हातपाय साक्ष  देतील असा विश्वास :  अल्लाह म्हणतो , " जो पर्यंत ते नरकात पोचत नाही त्यांचे कान , सोले , चामडी, सर्व त्यांच्या  विरुद्ध , ते जे करत होते त्याचे  साक्ष देतील . ते म्हणतील त्यांचाच चामडीला, का माझ्या विरुद्ध साक्ष देत. ती उत्तरेल , "  अल्लाहने आम्हाला बोलण्याची क्षमता आज दिली, तो हे सर्व करण्याचीक्षमता राखतो. त्याने तुमचे निर्माण प्रथम वेळाकेली आणि त्याच्याकडेच तुमचे परतणे आहे .

जगात असताना आपण स्वत:लालपवत गेला, हे समजून कि तुमचे कान, डोळे तुमच्या विरुद्ध पुरावा म्हणूनठरणार नाही. आणि तुम्हाला वाटले , “अल्लाहला तुम्ही जे काही करता ह्याचे ज्ञान नाही ?? सुरह  ४१ : २० -२२

6.       अल्लाह प्रश्न करणार ह्यावर  विश्वास  : अल्लाह म्हणतो , " थांबवा त्यांना, निश्चित त्यांना प्रश्न केले जाईल , काय  झाले तुम्हाल  ? आज नाही मदत कराल एकमेकांची जसे जगात करत होता??  हाय, पण त्या दिवशी ते हार मनातील   ( सुरह  ३३ :४० )

7.       विश्वास : कि सर्वांना  पूल ( सिरात ) पार करावे लागेल . अल्लाह म्हणतो , "  तुमच्या पैकी एकही असे नाही  ज्याचे ह्यापासून बचाव होइल. सर्वाना हे पूल पार करावे लागेल,  हा एक कायदाआहे प्रभूचा आणि तो लागू होईल.  ( सुरह   १९  :७१  )

8.       पाप कृत्यांचे वजन केले जातील हा विश्वास - अल्लाह लोकांना बोलवेल हिशोबासाठी त्यांच्या खात्यानुसार. बक्षिश दिले जाईल ज्यांनी नीतिमान कृत्ये  केली, त्यांच्या विश्वासाबद्दल, आणि देवदूतांचे अनुकरण करण्याबद्दल.  आणि ,जे  कुकर्म करून आलेत त्यांना शिक्षादिली जाईल .

अल्लाह म्हणतो ," पुनरुत्थानाच्या दिवशी न्याय तराजू लावण्यात येईल, कोणावरही अन्याय होणार नाही . एका राई च्या दाण्याएवढे कर्म देखील समोर आणण्यात येतील. हिशोब घेण्यास आम्ही पुरेसे आहोत ( सुरह २१/४७)

9.       पुस्तके  आणि रेकॉर्ड  प्रत्येकाला  हाताळण्यात येईल हा विश्वास - अल्लाह म्हणतो , " मग , ज्याच्या उजव्या हातात रेकॉर्ड दिले जाईल, निश्चित त्याचा हिशोब सोपा असेल आणि तो अपल्याकुटुंबाकडे खुशाल परतेल . पण , ज्याला त्याचे रेकॉर्ड त्याचा पाठमोरी दिले जाईल, त्याचे नाश निश्चित आहे. भडकणाऱ्या आगीत त्याला दाखल केले जातील आणि त्याची आग सोसावे लागेल / त्याची चव घावी लागेल”(सुरह  ८४ : ७ -१२)

10.   सार्वकालिक आणि अनंतकाळचे जीवन नंदनवनात अथवा नरकात बक्षिसिले  जातील हा विश्वास : अल्लाह म्हणतो ," निश्चित यहुदी आणि क्रिश्चिअन मधून जे अविश्वास करत होते आणि जे मुश्रीक अथवा मूर्तिपूजक होते त्यांचे ठिकाण नरकाची आग असेल. सर्वात वाईट प्राण्यांपैकी ते" निश्चित जे विश्वास आणि धार्मिक/ चांगले लोक कृत्यकरत होते ते उत्तम प्राणी.प्रभूजवळ त्यांचे बक्षिसनंदान्वानाच्या अप्रतिम बगीचे, ज्यांच्या खाली नद्या वाहतात. ते कायमचे तिथे वास्तव्य करतील.अल्लाह त्यांचावर खुश असेल आणि ते अल्लाहवर. हे, त्यांच्यासाठी जे परमेश्वराचा आदर करत होते व त्याचे भय त्यांच्यात होते .( सुर ९६/६-८)

11.   हौद  (कौसर ), मध्यस्थी, आणि अल्लाहचे  पैगंबर यांनी  जे सुचित केले होते त्यावर विश्वास –

 

अंतिम  दिवसावर विश्वासाचे फायदे-

Ø  आपणास त्या दिवसाची तयारी करण्यास मदत, चांगली कृत्य करण्यास प्रोत्साहन, आणि त्यात स्पर्धा, आणि  परमेश्वराच्या भीतीने  कुकर्मांपासून  स्वताचा बचाव

Ø  विश्वासअसण्यार्यांवरसांत्वन होईल कारण त्यांना माहित असणार ह्या जगातज्याच्यापासून  आपण वंचित राहिलो त्याचे प्रतिफळ अल्लाह आपल्याला देणार

Ø  फ़रक करता येईल विश्वास करणारे, आपल्या भक्तीत जे सच्चे आहेत आणि जे अविश्वासू  आहेत [4]

 

पहा:

अल्लाह;  मृत्युलोकाचे अलौकिक, नंदनवन, नरक,अतिं घटकेचे चिन्ह, हारुतआणि मारुत,  मृत्यू नंतर चे  जीवन;  जीवनाचा   हेतू;

 

संदर्भ

 

[1] http://www.ahya.org/amm/modules.php?name=Content&pa=showpage&pid=25

[2] http://en.islamway.net/article/8553

[3] http://www.ahya.org/amm/modules.php?name=Content&pa=showpage&pid=25

[4] http://www.1ststepsinislam.com/en/belief-in-angels.aspx

713 Views
आम्हाला ठीक करा, किंवा स्वत:ला ठीक करा.
.
Comments
सुरुवातीचा पान