देवदूतांवर विश्वास


हा विश्वास आवश्यक आहे कि देवदूत हे अल्लाहच्या निर्मितीपासून आहेत , अल्लाहशिवाय कोणालाही  त्यांची अचूक संख्या माहित नाही. ते न पाहिलेल्या विश्वातून आहेत. अल्लाहने त्यांना त्याच्या उपसणेसाठी आणि त्याच्या पूजेसाठी बनविले. ते सर्व अल्लाहच्या इच्छेनुसार सर्व सुव्यवस्था ,पहारा ,विश्व संरक्षण,  निरीक्षण  पाहतात . हे सर्व अल्लाहच्या हुकुमापासून आहे.

 

सामग्री
 

कुरआन

अल्लाह म्हणतो, "ख्रिस्त (ईसा)हे,आपण अल्लाहचे गुलाम असल्याचे कधीच नाकारणार नाही आणि त्यांना   त्याचे अभिमान असेल.  ना  ही दुसरे कोणते देवदूत जे अल्लाहच्या जवळ आहेत(सूरह ४:१७२)

 

देवदूत हेअल्लाह व त्याच्या देवदूतांच्या दरम्यान प्रतिनिधी म्हणून कार्य करतात . अल्लाह म्हणतो,  "विश्वसनीय रूह जिब्रील “अ स”यांनी संदेश खाली आणले आपल्या हृदयावर (ओ मुहम्मद) म्हणून तुम्ही लोकांना सावध करू शकाल,सरळ अरबी भाषा मध्ये “(सूरह २६ :१९३-१९५)

 

अल्लाह ने विशिष्ट कर्तव्यानसह देवदूत दाखल केले आहे, आणि ते त्यांच्या आज्ञेचे पालन करतात. अल्लाह म्हणतो: " त्यांना त्यांच्या प्रभुचे भय आहे आणि ते जी आज्ञा असेल त्याचे पालन करतात " (सूरह १६:५०)

 

देवदूत  , हे ना तर अल्लाहचे भागीदार, सहकारी, किंवा प्रतिस्पर्धी आहेत आणि ना त्याची मुलं , पण तरीही आपण त्यांचे आदर आणि त्यांना प्रेम केले पाहिजे. अल्लाह म्हणतो: "आणि ते म्हणतात की, “भव्य अल्लाहने एका लहान बालकाला जन्म दिला आहे.   तो(अल्लाह)प्रत्येक अपुर्नतेपसुन किव्हा दोषा पासून फार दूर आहे "   देवदूत हे फक्त सन्मानित गुलाम आहेत . जो पर्यंत अल्लाहचे हुकम होत नाही ते बोलत नाही आणि त्याचा हुकुमावरूनच ते कार्य करतात (सूरह २१/२६-२७)

 

देवदूत हे ,  अल्लाहची  पूजा, त्याचा आज्ञा पालन आणि गौरव -गुणगान करीत आपला वेळ खर्चकरतात . अल्लाह म्हणतो: "ते (म्हणजे देवदूत) रात्रंदिवस त्याची स्तुती आणि त्याचे गौरव न आळस ता करतात  (सूरह २१:२०)

 

हदीस

 देवदूत, प्रकाशापासून तयार केले होते. पैगंबर.म्हणतात कि , "देवदूत प्रकाश पासून, जिन्न अग्नीच्या वेगवेगळ्या ज्योतपासून(ज्याला धुवा नाही)तयार केले होते, आणि आदम काळा कोरड्या माती पासून. ('सही मुस्लिम २९९६)

 

 जरी ते प्रकाशापासून निर्माण करण्यात आलेत त्यांना आपण पाहू शकत नाही. अल्लाहने त्यांना विशेष क्षमता दिली आहे आपले रूप बदलण्यासाठी आणि साक्ष देण्यासाठी.अल्लाहने आपल्याला हि सूचना दिली आहे कि जिब्रील आ स एका माणसाच्या स्वरूपात मरियम “अ स”कडे आले . तिने स्वताला त्यांच्या पासून एका पडद्यामागे ठेवले. मग आम्ही जिब्रील “अ स”ला पाठविले एका माणसाच्या रुपात . ती ( मर्यम ) म्हणाली, " मी अल्लाहचे आश्रय घेते तुमच्यापासून , जर तुम्हाला देखील अल्लाहचे भय असेल तर “. देव्दुतानी उत्तर दिले ," मी फक्त आपल्या प्रभूकडून एक दूत आहे ह्या घोषणेसाठी कि तुला एक प्रामाणिक , सदाचरणी पुत्र प्राप्ती होईल " (सूरह १९/१७-१९)

 

अबू हुरेरा “र अ”सांगितले कि ,अल्लाहचे दूत पैगंबर. “स व स”म्हणतात कि , " दुतांचे एक गट तुमच्याबरोबर रात्री राहतो आणि एक गट दिवसा . हे दोन्ही असर आणि फज्र  नमाज च्या वेळी जमा होतात  . मग रात्रभर आपल्या बरोबर जे दूत होते ते स्वर्गात जातात आणि अल्लाह ( सर्व ज्ञानी)  आपल्या बद्दल त्यांना विचारतो , "कोणत्या स्तीतीत तुम्ही माझ्या गुलामाला सोडून आलात ?"  दूत उत्तर देतात , 'आम्ही त्यांना सोडले, तेव्हा ते प्रार्थना करीत होते, आणि आम्ही त्यांना गाठले तेव्हा ते प्रार्थना करीत होते.' ( सही बुखारी ७४२९ (व्हॉ. ९ , पुस्तक ९३ , हदीस५२५ )

 

अनस बिन मालिक “र अ”सांगितलेकि, पैगंबर ”स व स” म्हणतात , "  गर्भाशयात, अल्लाहने एक देवदूत नियुक्त केली आहे."देवदूत विचारतात , “परमेश्वरा थेंब स्त्रावचे ? (म्हणजे वीर्य), परमेश्वरा एक गाठ?, परमेश्वरा, मासाचा एक तुकडा?  " आणि मग जर मुलाचे निर्माण पूर्ण करण्याची इच्छा असेल अल्लाहची तर, देवदूत विचारतात ,  'परमेश्वरा ,  एक नर किंवा मादी?  परमेश्वरा, हवालदिलकि पवित्र ?  त्याच्या उपजीविकेचे साधन काय असेल? त्याचे वय किती होईल? 'मुल आपल्या आईच्या गर्भात असताना देवदूत हे सर्व लिहितात. (सही बुखारी ३३३३ व्हॉ. ४ , पुस्तक ५५ , हदीस ५५०)

 

अबू तल्हा “र अ”सांगितले: पैगंबर“स व स”म्हणाले , " ज्यांच्या घरात कुत्रा किंवा कोणते चित्रआहे त्या घरात (चांगले)दूत प्रवेश करत नाही  (सही बुखारी ३३२२ व्हॉ. ४, पुस्तक ५४ , हदीस ५३९)

 

तपशीलवार कार्य

अल्लाह ने आपल्याला देवदूतांची काही नावे व कार्याबद्दल माहिती दिली आहे . जसे ,जीब्रील “अ स”यांना संदेश आणण्याचे साक्षात्कार काम देण्यात आले होते . अल्लाह म्हणतो कि, "विश्वसनीय रूह जिब्रील“अ स”ह्यांनी आपल्याकडे संदेश खाली आणले ओ मुहम्मद “स व स”जेणे करून तुम्ही लोकांना संकेत आणि चेतावणी देऊ शकाल “. ( सूरह ९९ /७)

 

ईस्राफ़ॆल यांना , पुनरुत्थानाच्या दिवशी तुतारी फुंकण्याचे कार्य सोपवण्यात आले आहे तर ,मिकायील यांना   पाऊस आणि वनस्पतीची जबाबदारी दिली आहे .

 

प्रत्येक मनुष्यासाठी  दोन देवदूतांची नियुक्ती करण्यात आली आहे . आपल्या धार्मिक कृत्ये नोंद जो करतो आणि दुसरे जो पापांची नोंद करतो . अल्लाह म्हणतो: "लक्षात ठेवा , दोन देवदूत सतत तुमच्या प्रत्येक कार्याची नोंद करत आहेत , एक तुमच्या उजव्या व दुसरा डावीकडे आहे." (सूरह ५०:१७)

 

मृत्यू दूत (मलक-उल-मौत) यांना माणसाच्या मृत्यूच्या वेळी त्याची आत्मा जमा करण्याचे काम सोपवण्यात आले आहे अल्लाह म्हणतो , " सांगा :मृत्यू दूत , ज्याची तुमच्यावर नेमणूक केली आहे तो तुमची आत्मा  काढून घेईल आणि ती परत तुमच्या प्रभूकडे  घेऊन येईल "  (सूरह ३२ :११)

 

मानव संरक्षणासाठी देवदूत: अल्लाहच्या  आदेशानुसारप्रत्येकाच्या रक्षणासाठी सलग दूत आहेत .कोण पुढे आणि कोणी त्याच्या मागे. (सूरह १३ :११)

 

मालिक नरकाचा  राखणदार आहे: अल्लाह म्हणतो: "आणि ते प्रार्थना करतील : 'ओ मलिक तुमचा प्रभु आमचा  शेवट करु दे . तो म्हणेल. " निश्चित,आपण सदैव त्यात राहाल " (कुरआन सूरह  ४३ :७७)

 

रिध्वान स्वर्गाचा  राखणदार आहे. तेथे इतर देवदूत आहेत आणि प्रत्येक साठी कार्य नियुक्त केले गेले आहे. ह्यापैगंबरा मध्ये काहींची नावे कुरआन मध्ये नमूद करण्यात आली आहे,  आणि काहिचे नाही.पण त्या सर्वांवर आपले विश्वासआवश्यक आहे.

 

काही देवदूतांची नावे आणि त्यांची जबाबदारी

एका मुस्लिमचे सर्व देवदूतांवर विश्वास असणे आवश्यक आहे ,ज्याचे नोंद कुरआन किव्हा हदीस मध्ये केले गेले आहे 

  • जिब्रील: प्रकटीकरण पुरवण्याचे जबाबदारी
  • मिकाईल : पाऊस आणण्याची जबाबदारी
  • इस्राफील : पुनार्वास्थानाच्या दिवशी सूर फुंकण्याची जबाबदारी
  • मक-उल-मौत मृत्यूनंतर लोकांच्या आत्मा काढून घेण्याची जबाबदारी
  • हारूत आणि मारुत : इस्राएल लोकांची चाचणी म्हणून पाठविले.
  • किरामनआणि कातीबीन: लोकांच्या क्रिया रेकॉर्ड करतात.
  • संरक्षण (अल- मुअक़िबत ): लोकांच्या मृत्यूचे  आदेश मिळेपर्यंत ते त्यांचे संरक्षण करतात
  • रिध्वान:  नंदनवनाची जबाबदारी
  • मलिक: नरकाची जबाबदारी .
  • मुन्कर आणि नकिर- जे स्मशानात पुर्ल्यानंतर प्रश्न करतील.
  • सिहासन उचलणारे 
  • गर्भाशयात गर्भाचे भाविषाची नोंद  करणारे
  • जे रोज स्वर्गातल्या काबा मध्ये प्रविष्ट करतात - त्यांची संख्या  ७०,०००  प्रती दिवस 
  • अल्लाह आणि त्याच्या पुस्ताचे उल्लेख आणि अभ्यास जिथे केले जाते  त्या संमेलनात ते  खाली उतरता आणि वावरतात

 

देवदूतांवर विश्वासाचे फायदे 

  1. अल्लाहच्या महान निर्मितीसाठी खात्रीचा पुरावा आहे, त्याची प्रचंड शक्ती आणि क्षमता आणि त्याचा सर्व-समावेश ज्ञान  जेणेकरून त्याने संपूर्ण सृष्टीचे निर्माण केले
     
  2. जेव्हा एका मुस्लिम माणसाचे हे विश्वास असते कि आपल्या प्रत्येक कार्याची नोंद सतत होत आहे , जे त्याचा साठी साक्ष किव्हा त्याच्या विरुद्ध साक्ष असेल तेव्हा तो एकटा असो किव्हा लोकांच्या गर्दीत , नेहमीच तो पापांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल व चांगल्या,  भल्या गोष्टी करण्याची धडपड करेल.  
     
  3. अंधश्रद्धेपासून आणि दंतकथांपासून स्वताचे रक्षण करेल
     
  4. अल्लाहची दया आपण ओळखू शकतो,  कारण अल्लाहने प्रत्येकासाठी देवदूत नियुक्त केले आहेजे  त्याचे सौरक्षण करतात,पहरादेतात आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात

 

पहा

अल्लाह; इस्लाम मध्ये देवदूत; इमानचे स्तंभ   

 

संदर्भ

http://www.1ststepsinislam.com/en/belief-in-angels.aspx

 http://muttaqun.com/angels.html

  

1135 Views
आम्हाला ठीक करा, किंवा स्वत:ला ठीक करा.
.
Comments
सुरुवातीचा पान