इस्लाम आणि ज़कात

 ज़कात,  प्रत्येक मुस्लिम कडून अपेक्षित आणि सक्तीचे  एक  वैयक्तिक  "धर्मादाय"  आहे. हे धर्मादाय उपासनेचे एक रूप मानले जाते. इस्लामच्या ५ स्तंभांपैकी किव्हा त्याचा तत्वांपैकी ज़कात हे एक आहे.  बाकीचे  म्हणजे  अतूट विश्वास (शहदः ), रोझाची नमाज, उपवास, मक्काची हज्जयात्रा( तीर्थ ).

इस्लामिक राज्य किंवा समाजात ज़कातचेएक  महत्त्वाचे आर्थिक साधन मानले जाते. हे  धार्मिक रित्या मंजूर केलेले एक अर्थव्यवस्था आणि वित्त व्यवस्थापकीय पद्धत आहे.

अत्यंत काटेकोरपणे वैभवशाली  कुरआन आणि हदीस मध्ये याचे उल्लेखकेले गेले आहे

सामग्री

शब्दार्थ

शब्दार्थ पाहता ज़कात म्हणजे " शुद्धीकरण ".  एका मुस्लिमसाठी त्याची संपत्ती आणि आत्मा शुद्ध करण्या संदर्भितसंपत्तीचे शुद्धीकरण म्हणजे मालमत्तेची जी जमवाजमव आहे त्याचे वितरण, आर्थिक वाढ आणि त्याचे योग्य वित्रीकरण.आत्माचे शुद्धीकरण अर्थात द्वेष, मत्सर, स्वार्थ,  अस्वस्थता, ह्या सर्वापासून मुक्ती. इतर  अर्थांमधून हे कि पाप शुद्धीकरण समावेश आहे.

तांत्रिकदृष्ट्या, ज़कात  निश्चित प्रमाणात जरुरीपेक्षा जास्त असणार्या मालमत्तेवरून एका मुस्लिम कमाईतूनवसूल केलेले एक योजन आहे.त्याचेवाटप नंतर गरजूंना,  सामाजिक योजनेसाठी आणि समाज्याचा पायाभूत सुविधांसाठी  वितरीत केले जाते. हे योगदान प्रत्येकवर्षी(मुस्लिम दिनदर्शिका / हिजरी) कॅलेंडर अनुसार केले जाते

मूलभूत आवश्यक, कुटुंब खर्च, कर्ज, देणग्या आणि करखर्च केल्यानंतर एका मुस्लीमकडे जी मालमत्ता किव्हा रक्कम निव्वळ शिल्लक राहते त्यावर ज़कात लागू पडते.  हिजरी वर्षाच्या शेवटी प्रत्येक मुस्लिम पुरुष  किंवा स्त्री यांना हे  भरणे आवश्यक आहे.

85 ग्रॅम सोने ( म्हणजेच साडे सात तोळे - ७.५ ) किंवा  ह्या पेक्षा अधिक रोख रक्कम किंवा चांदी 595 ग्रॅम (साडे बाव्वन तोळे- ५२.५ ) ह्यावर  2.5%  ( अडीच टक्के ) किमान दराने ज़कात देणे आवशक आहे.

 

ज़कातचे उद्देश

 ज़कात- ह्याला  एक खोल मानवतावादी आणि सामाजिक-राजकीय मूल्य आहे. या धार्मिक कायद्यामुळे अति  संपत्ती- फलक प्रतिबंधित करते आणि हि संपत्ती गरिबांना वितरीत केले जाते .  ह्यामुळे  मुस्लिम  बांधवातएकता पनपते.

 ज़कात वितरण  केल्यामुळे  आत्मा  ही शुद्ध होते आणि देवाच्या असंख्य उपकारांचीकृतज्ञता व्यक्त करण्यास प्रोत्साहन देते.

 

कुरआन

 सर्व मुस्लिम जे पुरेशी श्रीमंत आहेत त्यांनी आपली सर्व संपत्ती अल्लाहच्या नजरेत शुद्ध करण्यासाठी हा  धर्मादाय सुरू करणे आवश्यक आहे . दुसऱ्या शब्दांत, अल्लाह ( सर्व तारीफ त्याच्यासाठी )  आपणास संपत्ती बहाल करून आपणांवर त्याचे उपकार आणि आशीर्वाद  देतो . म्हणून आपले कर्तव्य आहे कि ह्या संपत्तीतून काही  मालमत्ता आपण समाजाला परत करावे.  जे गरीब व गरजू आहेत त्यांना त्याचा वाटाद्यावा.  ह्यामुळे  आपल्या मालाचे शुद्धीकरण होते . अल्लाह म्हणतो कि ,  '. तुम्ही त्यांच्या  संपत्तीतून  घ्या म्हणजे तुम्ही त्यांचे माल शुद्ध करण्यास त्यांना मदद कराल "  सुरह  तौबा ९ : १०३

 

शरिअह्चेनिर्णय 

 हे ,कुरआन मध्ये असलेल्या अल्लाह च्या स्टेटमेंट वर आधारित आहे: "आणि जे  सोने, चांदी, साठऊन ठेवतात आणि अल्लाहच्या मार्गावर खर्च करत नाही - त्यांना एक वेदनादायक शिक्षेची बातमी द्या."  सुरह तौबा ९ :३४

ज्या  लोकांना निसब(आवश्यक रक्कम) लागू पडते त्यांना ज़कात,अनिवार्य कायदा अंतर्गत देणे भाग आहे .  ज़कात देणे एक आवश्यकअनिवार्य इस्लामिक कायदा आहे आणि इस्लामच्या ५  स्तंभांपैकी एक आहे . ( सहिः  अल बुखारी १ /८)

 

कारणे:  ज़कात आवश्यक होण्यासाठी

ज़कात देण्यासाठी दोन गरजेचे अटी आहेत,  संपत्ती रक्कम आणि इस्लाम मध्ये नमूद कालावधी.  प्रत्येक मुस्लिम ज्याच्या कडे एक निश्चित रक्कम ,  कमीत कमी नमूद केलेले माल ( ज्याला निसब म्हणतात ) आणि जो दुसर्या अटी पूर्ण करतात त्यांना ज़कात देणे अनिवार्य आहे .

 

सर्वसाधारणपणे ज्या गोष्टींवर किव्हा मालमत्तेवर ज़कात देणे आवश्यक आहे 

 सोने साठी  निसब  रक्कम वीस मित्क़ल , किंवा -  85 ग्रॅम आहे. चांदी साठी निसब -  शंभर आणि चाळीस मित्क़ल , किंवा - 535 ग्रॅम आहे. जर, एका स्त्री कडे जे तिच्या मालकीचे सोने आणि चांदी आहे त्याची रक्कम  ह्या दागीण्यापेक्षा कमी प्रमाणात असेल तर तिला ज़कात लागू (वाजिब) पडत नाही   .

 

गोल्ड / सोने

सोने ज्यावर ज़कात लागू पडते - 85 ग्रॅम आहे. जर हि रक्कम किव्हा ह्यावून जास्त आपल्या ताब्यात एकावर्षा पेक्षाअधिक काळापर्यंत असेल तर त्यावर ज़कात देणे आवशक आहे.ह्याचे प्रमाण १० भागातला एक चतुर्थांश ( 2.5%), किमान २.१२५ ग्राम

 

चांदी / Silver 

595 ग्रॅम किंवा अधिक जर चांदी असेल किव्हा ह्यापेक्षा ज्यास्त आणि ती एक वर्षा पेक्षा जास्त कालावधीत आपल्या जवळ आहे , तर त्यावर ज़कात देणे आवशक आहे.   ती रक्कम १० भागातली एक-चतुर्थांश आहे (2.5%),   अंदाजे 14.87 ग्रॅम

 

रोख रक्कम ज्यांना  देणे भाग आहे

 जर का आपल्या कडील रोख रक्कम नमूद केलेल्या सोने किव्हा चांदी ज्यावर ज़कात लागू आहे ह्या  रकमे  एवढी असेल आणि जर ,  हि रक्कम  आपल्याकडे एक पूर्ण वर्षा साठी निसब रक्कमेच्या वरती आपल्या जवळ राहील तर त्यावर ज़कात आवशक आहे . आणि ह्या बाबतीत ती रक्कम देखील एक दशांश एक चतुर्थांश असेल 2.5%

 

मालमत्तेचे प्रकार

  सोने, चांदी, रक्कम ह्या व्यतिरिक्त ज्या गोष्टींवर ज़कात कर अनिवार्य आहे

·         स्त्रीयांकडीलसोने, चांदीचे दागदागिने जे  सुशोभीकरणाचा उद्देशाने वापरली जाते

·         पशुधन जनावरे-  उंट, गायी, आणि मेंढी.

·         अन्न धान्य आणि फळ व इतर काही गोष्टी

 

ज़कात  प्राप्तकर्ते

कुरआन मध्ये नमूद असलेल्या आठ  लोकांचे गट असे आहेत ज्यांच्यावर ज़कात अनिवार्य आहे .( येथे अरबिक शब्द," अस सदक़ात"  म्हणजे अनिवार्य दानधर्म अर्थात ज़कात )

ज़कात ज्यांच्यावर देणे लागू आहे ती म्हणजे फक्त गरीब ,गरजू , ज़कात जमा करून त्याचे रीतसर वाटप करण्यासाठी जी लोक नेमली गेली आहेत, इस्लामसाठी अंतकरणेजुळवण्याच्या उद्दिष्टाने, कैदी किंवा गुलाम यांना  मुक्त करण्यासाठी, एखाद्याचे कर्ज फेळण्यासाठी,  अल्लाहच्या मार्गावर खर्च,  आणि संकटात अडकलेले प्रवासी (  सुरह  तौबा  ९ : ६० )

vगरीब लोक - ज्यांच्या कडे  गरजेपेक्षा कमी सामान आहे

vनिराधार लोक - निश्चितपणे  ज्यांच्याकडे काहीच नाही

vज़कात जमा  करणारे -  ज़कात जमा करून योग्य रित्या त्याचे  वितरण करण्यासाठी ह्यांना खास नेमले जाते .

vनव मुस्लिम - ज्याचे  आपल्या कुटुंबियां पासून संबंद तुटले किव्हा तानावलेले आहे आणि ज्याला मदतीची गरज आहे

vगुलाम - ज्या ठिकाणी /वेळी  गुलामगिरी अस्तित्वात आहे जेथे  गुलामगिरीतून त्यांची मुक्तता   

vकर्जदार  - भयानक कर्जात अडकलेल्या लोकांना त्यातून मुक्तता 

vजे अल्लाह च्या मार्गासाठी  काम करत आहेत

vगरजू प्रवाशी  - जे  प्रवास दरम्यान अडकले गेले  आहेत किव्हा संकटात आहेत

 

शिक्षा - निसब लागू झाल्या नंतर देखील जे ज़कात देत नाही

 पै मुहम्मद स व सम्हणतात कि , " ज्या कोणाला अल्लाहने संपत्ती दिली आहे आणि जो श्रीमंत आहे,जर का त्याने ज़कात दिली नाही तर पुनरुत्थानाच्या दिवशी त्याची हिच संपत्ती एका विषारी , गुळगुळीत डोके आणि डोळ्यांवर दोन काळे ठिपके  असणाऱ्या सापात रुपांतर केली जाईल . हा साप त्याच्या  गळ्या भोवती वेटोळे घालेल आणि त्याच्या गालांवर डसेल . " मीच तुझे धन, मीच तुझी संपत्ती " असे तो साप म्हणेल ( अल बुखारी १४०३  २/४८६)

 

पूर्वीच्या देव्दुतांवर

ज़कात चा इतिहास प्रार्थने समान  आहे . कुरआन मधून स्पष्ट होते  कि , प्रार्थने प्रमाणे त्याचे आदेश नेहमीच इस्लामिक देवदूतांच्या शर्यतीत  अस्तित्वात  होते . अल्लाहने जेव्हा मुसलमानांना ज़कात चे हुकम दिले तेव्हा ते  काही त्यांना अनोळखी न्हव्ते .  इब्राहीम अ स च्या सर्व अनुयायीना त्याचे पूर्ण ज्ञान होते . आणि ह्याच कारणामुळे कुरआन ने ह्याला , "एक विनिर्दिष्ट हक्क " असे संभोधिले आहे  ( सुरह मारीज ७० / २४ )

अतः हे एक पूर्व अस्तित्व होते जे मुहम्मद  स व स (अल्लाह त्यांना  सन्मान व शांती देवो ) यांनी,आवश्यक ती सुधारणा करून अल्लाहच्या हुकुमानुसार ज़कात दिली.  कुरआन मध्ये म्हंटले गेले आहे ,"  जसे इस्माईल अ स ने प्रार्थनेसाठी आपल्या घरच्यांना दिग्दर्शित केले, तसेच ज़कात बाबतीत हि केले . ." ते आपल्या घरच्यांना नमाज आणि ज़कात बाबतीत निर्देश करीत आणि त्यांचे परमेश्वर  त्यामुळे त्यांच्यावर प्रसन्न होते .( सुरह मर्यम १९/५५) . इस्राईली लोकांशी अल्लाहने एक वचन ह्या शब्दात  केले , " मी तुमच्या बरोबर आहे जर का तुम्ही प्रार्थना आणि ज़कात बाबतीत तरबेज राहाल " ( सुरह  माईदा   ५ :१२)

देव्दुतान्बद्दल जे  इसाक अ स आणि याकुब अ स यांच्या संततीतून होते , कुरआन चे म्हणणे आहे कि , " आम्ही त्यांना प्रेरणा दिली चांगल्या कामांसाठी आणि नमाज व ज़कात देण्या बाबतीत ( सुरह आंबिया  २१/७३)

देवदूत ईसा अलैहिस्सलामस्वत:बद्दल हे म्हणत कि ," देवाने मला निदर्शन केले,जो पर्यंत मी जिवंत आहे नमाज  आणि ज़कात नियमितपणे पूर्ण करावे ( सुरह मर्यम १९/३१ )

सर्वशक्तिमान  अल्लाह कुरआन मध्ये  म्हणतो: "आणि  त्यांच्या पैकी ज्यांना पुस्तक दिले गेले होते ते आपसात स्पष्ट चिन्ह मिळाल्यानंतर देखील विभागित झाले. आणि ह्या ग्रंथात त्यांना अल्लाहची उपासना करण्याचे निदर्शन होते,प्रामाणिक अल्लाह ची  भक्ती शलेअशा आणि ज़कात चे स्पष्टीकरण दिले गेले होते . आणि सत्य तर हे आह एकी हेच खरे धर्म आणि सचोटीचा राष्ट्र आहे . (सुरह बय्यिनः ९८/ ४,५ )

 

हदीस

खूप गोष्टी अश्या आहेत ज्यात  कालिक ( तात्पुरते )  प्रेमाचा समाविष्ट आहे । पण सर्वात शक्तिशाली आणि धोकादायक इहवादी  अर्थात भौतिक संपत्ती वर अतोनात  प्रेम. म्हणूनच पै मुहम्मद स व सयांनी एका मुस्लीमसाठी हि  संपत्ती  सर्वात मोठे आमिष असल्याचे  मनात . " माझ्या उम्मत ( पिढीसाठी ) हि एक चाचणी आहे " तीर्मिधी ४८१ मुस्तद्रक  हकीम ४/३१८ जर का एक मुस्लिम ह्या संपत्तीच्या आमिषा पासून स्वताला वाचवू शकला तर तो खुपश्या दुर्गुणांपासून स्वताचा बचाव करू शकतो "

ज़कात चे एक दुय्यम उद्देश गरीब मुस्लिम बांधवाना  मूलभूत आवश्यक प्रदान करण्यासाठी आहे. पै मुहम्मद (अल्लाह त्याला सन्मान व  शांती देवो ) म्हणाले, " निश्चित , अल्लाह ने मुसलमानावर ज़कात भरणे अनिवार्य केले आहे " श्रीमंतांकडून घेऊन ते गरिबांना दिले जाईल . सही मुस्लिम १/२१. ही परंपरा हे स्पष्ट करते कि गरिबांच्या हक्कासाठी एका सामाजिक आणि आर्थिक पैलू ज़कात मधून दिसून येते  आणि ज्याच्याशिवाय त्याचे इस्लामिक दृष्टीकोन अपूर्ण राहते

पै मुहम्मद स व स म्हणतात कि, " ज्या कोणाला अल्लाहने संपत्ती दिली आहे आणि जो श्रीमंत आहे,जर का त्याने ज़कात दिली नाही तर पुनरुत्थानाच्या दिवशी त्याची हिच संपत्ती एका विषारी , गुळगुळीत डोके आणि डोळ्यांवर दोन काळे ठिपके  असणाऱ्या सापत रुपांतर केली जाईल . हा साप त्याच्या  गळ्या भोवती वेटोळे घालेल आणि त्याच्या गालांवर डसेल . " मीच तुझे धन , मीच तुझी संपत्ती " असे तो साप म्हणेल ( अल बुखारी १४०३  २/४८६)

 

ज़कात ज्याच्या वर देणे  आवश्यक  आहे

इस्लाम मध्ये एक चंद्र वर्ष कालावधी उलटून गेल्यावर ज़कात देणे  अनिवार्य आहे जे  माल  एखाद्याच्या मालकी  हक्काचे आहे . मग त्या मालकाला त्या मालावर२.५ % (  or 1/40)  ज़कात भरणे आवश्यक आहे

 

इस्लाम मध्येधर्मदायचे प्रकार

इस्लाम मध्ये धर्मदाय चे  दोन प्रकार आहेत .एक आवश्यक अनिवार्य  असणारा आणि दुसरे स्वयंसेवी अनुक्रमे ज्याला सदक़ा म्हणतात. ज़कात,  ह्या शब्दाचे मूळ " जका " ह्या  क्रियापदापासून उत्पन्नझाले आहे. ह्याचा अर्थ " शुद्धीकरण ",  " भरभराटने  ",  " पोसणे " असे आहे .  आपल्या मालातून जो भाग आपल्या  भरणपोषण नंतर अधिक आहे , त्या मालाचे शुद्धीकरण करणे अर्थात उर्वरित संपतीतून काही नमूद केलेले माल ज़कात म्हणून देणे जेणेकरून्‌  देणाऱ्याचे माल कायद्याने तो  योग्य रित्या वापरू शकतो

ज़कात , कुरआन आणि हदीस ह्या व्यतिरिक्त मुहम्मद स व सयांची  परंपरा ,  त्यांच्या म्हणी (लोकोक्ती) , आणि त्याने केलेले कार्य, हे  सदक़ा आणि ज़कात ह्या दोन्ही गोष्टींवर भर घालतात ज्याचा हेतू  गरजूंसाठी आहे.

 

ज़कात चे  फायदे

इस्लामिक आदेश अनुसार ज़कातचे फायदे भरपूर आहेत ज्यापैकी काही खाली नमूद केले आहे-

1.     हे समाजातील गरीब लोकांचे गरजा पूर्ण करते.

2.     गरीब आणि श्रीमंत यांच्यातील चांगले संबंध मजबूत करते,नैसर्गिकरित्या प्रत्येकाला त्याच्याशी जे चांगली कृत्ये करतो त्यांच्याकडे  ओढ /कल असते .

3.     ते स्वत: ला  शुद्ध आणि पवित्र करते. अभिलाषा आणि लोभ याच्या मायेतून बाहेर काढते. जसे कुरआन मध्ये म्हंटलेआहे, त्यांच्या संपत्तीतून सदक़ा, दानधर्म घ्या आणि त्यामुळे त्यांना शुद्ध आणि पवित्र करा ( सुर ९ / १०३ )

4.     गरीब व गरजू व्यक्तींच्या दिशेने  औदार्य आणि सहानुभूती चे  प्रोत्साहन  एका मुस्लिम मध्ये निर्माण करते

5.     ज़कात दिल्यामुळे  अल्लाह चे  आशीर्वाद आकर्षित करते ; संपत्तीत वाढ आणि  जे घालवले माल काही त्याची भरपाई करते . अल्लाह वर्णन करतो , " तुम्ही जे काही अल्लाहच्या मार्गासाठी खर्च कराल अल्लाह त्याची तुम्हाला परतफेड करणार . तोच सर्वात उत्तम  पालन पोषण करणारा आहे ( सुरह ३४/ ३९)

पहा _ अल्लाह ,देवदूत मुहम्मद , इस्लामचे स्थंभ , इस्लाम आणि दानधर्म

 

संदर्भ

[a] http://www.tamilislam.com/english/basic/Zakath_sadaqah.htm

[1] http://islamqa.info/en/ref/50801

[2] http://www.missionislam.com/knowledge/zakat.htm, http://quran.com/9/60

[3] http://quran.com

[4] http://www.islamhouse.com/p/316361

[5] http://www.sunnah.com

 [6] http://www.islamicity.com/mosque/zakat/

[7] http://forums.islamicawakening.com/f20/what-is-the-difference-between-sadaqa-zakat-47629/

 [8] http://www.islamhouse.com/p/316361

777 Views
आम्हाला ठीक करा, किंवा स्वत:ला ठीक करा.
.
Comments
सुरुवातीचा पान