इस्लामचा रद्दबातल किंवा इस्लाम रद्दहोण्याची कारणे

इस्लाम ज्यामुळे रद्द होईल,अर्थात ( नावाकीद -उल-इस्लाम) - ह्या  त्या गोष्टी आहेत ज्यामुळे एखाद्याचे इस्लाम रद्द होईल. त्यांना ‘रद्दबातल ‘ म्हंटले आहे कारण एखादी व्यक्ती ह्यापैकी एकही गोष्ट करेल  तर त्याचे  धर्म रद्द होईल.  आणि एक मुस्लिम आणि विश्वास करणाऱ्यांपैकी असल्यापासून तो एक शिर्क अर्थात एक अल्लाहला मानणाऱ्या पासून अनेक मुर्तीपुजकांनI मानणाऱ्या यादीत शामिल होईल. आम्ही अल्लाह कडे, सर्व स्तुती ज्याची आहे,सूरःक्षितता आणि संरक्षण मागतो.  

सामग्री

परिचय

 रद्दबातल आणि अवैधता एखाद्याचे धर्म, तौहीद आणि इमान रद्द करते. जसे शुद्धता कशी अशुद्ध होते तशीच. एखादी  व्यक्ती जर वजू ( जसे अभ्यंगस्नान) करेल आणि स्व:ताला प्रार्थना साठी शुद्ध करेल, आणि ह्यानंतर जर त्याचे वजू रद्द होईल ( मोडेल ),पुढील कारण मुळे-  लघवी, मलविसर्जन, वारा सोडणेतर त्याची विधीसाठी केलीली पवित्रता मोडते आणि त्या विधीसाठी त्याची रद्दता करण्यातयेते. ह्या स्तिथीत ती व्यक्ती पवित्र्याचा गठातून अपवित्राच्या गठात होतो.

अशीच स्थिती आहे जो एकदा विश्वास करून आणि तौहीदची कबुली देऊन मुस्लिम होतो आणि जर का तो इस्लामचे मुख्य कायदे मोडतो तर त्याचा धर्म रद्द करण्यात येतो.अश्या स्तिथीत जर का त्याचे मरण येईल तर तो नरकाचा भागीदार होतो.

 

कुरआन

अल्लाहने आपल्या गुलामांवर,इस्लाम मध्ये दाखील होणे सक्तीचे केले आहे आणि त्याच बरोबर त्याला धरून ठेवणे.जे इस्लाम शिवाय दुसरे धर्म स्वीकारतील त्यांना बजावले  आहे.

"आणि जो कोणी इस्लाम शिवाय दुसरे धर्म स्वीकारतो ते कदापि कबुल केले जाणार नाही आणि मृत्युनंतरच्या  जीवनात तो निश्चित अपयशी ठरेल .(सूरः इम्रान ३/८५ )

अल्लाहने संदेश्कर्ता मुहम्मदयांना पाठविले जेणेकरून ते मानवजातीला इस्लामचे आमंत्रण देतील. अल्लाहने कुरआन मध्ये म्हण्टले आहे कि ,” खऱ्या मार्गदर्शनावर ती लोक आहेत जे इस्लामच्या शिकवणी अनुसार जीवन व्यतीत करतील अथवा ते सरळ  दिशाभूल झालेले आहेत“ .

ठिकठिकाणी अल्लाहने आपणास स्वमतत्याग आणि शिर्क ( मूर्तिपूजक /अल्लाह शिवाय दुसरे कोणालाही उपासनेचे योग्य मानणे) ह्यापासून  बजावले  आहे. धार्मिक विद्वानांनी आपणास ताकीद दिली आहे कि असे अनेक स्वमतत्यागी भेटील जे तुम्हाला इस्लाम पासून दूर नेण्याचा प्रयत्न करतील .पण जर आपण परलोकात सुख उपभोगू इच्छितो तरआतापासून ह्या नमूद केलेल्या १०  गंभीर गोष्टीन पासून सावध राहिले पाहिजे.

 

१० अटी जेणेकरून इस्लाम रद्द करण्यात येईल

1.       अल्लाह बरोबर दुसऱ्या कोणालाही उपासनेच्या योग्य मानणे अथवा शिर्क करणे .

कुरआन मध्ये सांगितले आहे कि , " अल्लाह क्षमा कदापि करणार नाही त्यांची, जे त्याच्या बरोबर दुसरे कोणालाही पूजेच्या योग्य ठरवतात. त्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही जर पाप /गुन्हाअसेल तर त्याची इच्छा असेल तर तो ते माफ करेल " (सूरः निसI४/११६ )

" जो कोणी अल्लाह बरोबर दुसर्या  कोणाला भागीदार ठरवेल आग त्याचे ठिकाण आहे आणि स्वर्ग त्यासाठी अर्थातच नाही. आणि  दोषी साठी कोणी मददगार नसणार”( सूरः मायेदः ५/७२ ).  उपासना चे प्रकार म्हणजे मयत(मेलेल्या)लोकांच्या द्वारे मदद मागणे,  बळी देणे, त्यांच्या नावानी शपथघेणे इत्यादी.

 

2.       अल्लाह आणि आपल्या  दरम्यान  मध्यस्थी शोधने आणि अल्लाहवर विश्वास ठेवण्यापेक्षा  मध्यस्थी  करणाऱ्यावरच पूर्ण विश्वास ठेवणे . असे करणारे सर्व,जाहीररीत्या अल्लाहवर अविश्वास करणारे लोक आहेत . अल्लाह त्यांना अविश्वासही आणि खोटे लोक असे संबोधतो . ते (लोक ) म्हणतात ," आम्ही फक्त त्यांना मानतो कारण ते आम्हाला अल्लाहच्या जवळ नेण्याचे प्रयत्न करतात . निश्चित अल्लाह त्यांच्या मध्ये निवाडा करेन . नक्कीच पूर्णता सर्व स्तुती फक्त अल्लाहसाठीच आहे अल्लाह खोटे बोलणाऱ्याचे  आणि ठाम अविश्वास करणाऱ्याचे  मार्गदर्शन करीत नाही. " (सूरः जूमर ३९/३)

त्यामुळे  ते खोटे आहेत त्यांच्या बोलण्यावरून आणि त्याच्या कृतीतून ते अविश्वासू आहेत .

 

 

3.       अनेक देवतांना मानने, देवाचे स्थान दुसर्या कोणाला देने,  किव्हा अविश्वास करणे,  हे सर्व करणारे.शंका  नाही कि ते  अविश्वास करणारे लोक आहेत. 'अनेक देवतांना मानणारे'    ह्या वाक्य प्रचारातून विविध प्रकारच्या सर्व तऱ्हेच्या शिर्कचे  समावेश आहे. त्यामुळे जो कोणी ह्या गोष्टीचा नकार करतो तो स्वतः  देखील अविश्वास करणाऱ्यांपैकी आहे

 

 

4.       हा विश्वास असणे कि मुहम्मदयांचे शिकवण / मार्गदर्शन पूर्ण किंवा परिपूर्ण नाही,किंवा इतर  सत्ताधारी लोक आणि न्याय करणारे लोक त्याच्या पेक्षा चांगले आहेत.जे खोटे देव मानतात ते दिखाऊ पणा  करणारे लोक आहेत. जो कोणी मुहम्मदयांच्या मार्गदर्शना पेक्षा दुसरे कोणतेही  मार्गदर्शन चांगले आहे असा विश्वास आहे.

 

5.       जो कोणी मुहम्मदयांच्या शिकवणीनचे पालन तर करतो,  पण त्याला त्यावर  विश्वास नाही तर..तो देखील एक अविश्वासू आहे . कुरआन  म्हणतो ," हे ह्यामुळे कि जे अल्लाहने खाली पाठविले त्याचा ते तिरस्कार करतात.त्यामुळे अल्लाहने त्यांचे सर्व कृत्ये निष्फळ केले आहे”. ( सूरः मुहम्मद ४७/९)

 

6.       जे कोणी इस्लामच्या शिक्षणाचे उपहास करतो, जसे क्षिक्षा किव्हा परलोकात मिळंणारे बक्षीस हि लोकं  अविश्वास करणारे आहेत . कुरआन  म्हणतो , " बोलI, काय तुम्ही अल्लाह , त्याचे  चिन्हे, आणि त्याच्या संदेश्कार्ताचे उपहास करत होता ? आता कोणतेही सबब  सांगू नका कारण तुम्ही एकदा स्वीकारल्यानंतर इमानचे नकार केले आहे .(सूरः तौबा ९/ ६५ &६६ ).

 

7.       जादू : सर्व तऱ्हेचे,जसे एखाद्याला दुसर्यापासून दूर करणे ज्यांचे आपसात प्रेम आहे  , किव्हा ज्याची ओढ नाही त्याबद्दल एखाद्याच्या मनात ओढ निर्माण करणे . जी कोणी असे जादू करतात किंवा ते  मान्य करतात ते स्वतः अल्लाहवर  अविश्वास करणारे आहेत . कुरआनच्या आयात मधल्या  पुराव्यांवरून,जे  सांगते कि,"  ह्यापैकी कोणत्याही देवदूतानी  हे शिकवलेनाही आणि जे,ते नेहमी म्हणाले कि , " आम्ही फक्त एक चाचणी म्हणून पाठवले गेले आहोत, त्यामुळे अविश्वास करू नका (सूरः बक़रः २/१०२ )

 

8.       उदाहरणात : अविश्वास करणाऱ्यांच्या,विश्वासावर विश्वास ठेवणे आणि त्यांना पाठींबा देणे , ज्यामुळे ते त्रासले गेले आहेत त्यांना आणखी त्रास देतील . कुरआन  म्हणतो ," तुम्च्यापैकि जो त्यांच्याकडे मैत्रीचे हात करेल तो त्यांच्यापैकीच आहे निश्चितच  अल्लाह अन्याय करणाऱ्यांचा  मार्गदर्शन करत नाही (सूरः मायीदा ५/५१)

 

9.       जो कोणी हे मानतो कि आपल्या हातात आहे किव्हाआपल्याला अधिकार आहे  इस्लामचे  नियम स्वतःच्या फायद्यासाठी  तोडण्याच्या किव्हा बदलण्याचा,तोएक अविश्वास करणारा आहे.कुरआन  मध्ये नमूद आहे ," जे कोणी इस्लामचा व्यतिरिक्त इतर धर्म मागत आहे, ते मान्य केले जाणार नाही आणि अनंत काळात ते अपयशी ठरतील  ( सूरः अल इम्रान ३/८५ )

 

10.    इस्लाम पासून पाठ मोडणे आणि हट्टाने त्याच्या शिकवणीचा नकार करणे,किव्हा त्या अनुसार कृत्य करण्यास अमान्य करणे.  कुरआन  म्हणतो ," ह्यापेक्षा घोर चूक कोण करता कि जेव्हा त्यांना अल्लाहची आठवण करून देणारे किव्हा त्याचे सत्य दर्शवून देणारे चिन्ह दाखवू तर..ते साफ नाकारतात ?..  निश्चितच ते बंडखोर आहेत आणि आम्ही त्याचा बदला त्यांना नक्की देणार (सुरः  सजदा ३२/२२)

 

निष्कर्ष

 या  सर्व अवैध करणाऱ्या लोकांमध्ये काही फरक नाही. जे थट्टेने  करतात, किव्हा गंभीर स्वरूपाने. फक्त तो,जो त्याच्या इच्छा विरुद्ध भागीदार मजबुरीने बनतो. हे सर्व धोकादायक आहेत आणि दुखद गोष्ट म्हणजे करणारे जास्त मुस्लिम आहेत. त्यामुळे मुस्लिम यांनी स्वतःची  काळजी घेऊन सावध राहणे आवश्यक आहे.

आम्ही अल्लाहकडे  आश्रयमागतो,त्याच्या  वेदनादायक शिक्षा पासून आणि त्या सर्व गोष्टींपासून जेणेकरून त्याचा क्रोध होईल. अल्लाहचे आशीर्वाद आणि सुख शांती असो त्याचे संदेश्कर्ता नबी मुहम्मद   आणि त्यांचे कुटुंब आणि थोर  सोबतीवर ( अल्लाह त्या सर्वांवर  प्रसन्न  राहो )

 

संदर्भ

तपशील साठी  आपण वाचू शकता

“ The Authentic Creed and the Invalidators of Islam”

 शेख अब्दुल अझीझ बिन अब्दुल्ला बिन बाज ,

 

728 Views
आम्हाला ठीक करा, किंवा स्वत:ला ठीक करा.
.
Comments
सुरुवातीचा पान